सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भोंदू बाबाच्या अघोरी विद्येचा प्रकाराने एका तरुणाला आपला जीव गमविण्याची वेळ आली आहे. नाशिक जिल्हयातील बागलाण तालुक्यातील आलीयाबाद येथे हा प्रकार घडला आहे. प्रविण गुलचंद सोनवणे असे या आदिवासी जीव गमावणा-या तरुणाचे नाव आहे.
पिंपळकोठे येथील प्रविण सोनवणे तब्बेत बरी नसल्याने तो उपचारासाठी आलियाबाद येथील या भोंदू बाबाकडे उपचार करण्यासाठी जात होता. त्याचप्रमाणे भोंदू बाबा याचेही मृताच्या घरी जाणे येणे होते. आठवडाभरापूर्वी मृत प्रविण सोनवणे हा भोंदू बाबाकडे उपचारासाठी गेला होता. मात्र बाबाने अघोरी उपाय करुन प्रविण सोनवणे याचा जीव घेतला. त्यानंतर घरातच मृतदेह टाकून तो बाहेर निघून गेला. मृताचे कुटुंबीय मुलगा घरी आला नाही म्हणून त्याचे कुटुंबीय भोंदू बाबाला फोन करुन विचारणा करीत होते. मात्र बाबा त्यांना उडवा उडवीचे उत्तर देत होता.
आदिवासी वस्तीत भोंदू बाबा याचे एकांतात घर असल्यामुळे त्याकडे कोणाचे लक्ष जात नव्हते. मात्र गावातील दोघांना संशय आल्याने त्यांनी याची माहिती पोलिस पाटील यांना दिल्यानंतर त्यांनी जायखेडा पोलिसांशी संपर्क साधत पोलिसांनी घटनास्थळी पोहतच पाहणी केली. त्यावेळेस प्रविण याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. दरम्यान तुळशीराम बुधा सोनवणे हा भोंदू बाबा मात्र आपल्या एका साथिदारासह फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. या भोंदू बाबावर कड कारवाई करण्याची मागणी होत आहे.
Nashik Satana Crime Superstition Youth Death