सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील लखमापूर येथील खाद्य पदार्थ विक्रेते समाधान निंबा पवार हे आपल्या व्यवसायासाठी लागणारे खाद्य पदार्थ तयार करीत असतांना ते तयार झाल्यानंतर गरम तेलाची कढाई उतरुण दुस-य कामात व्यस्त असतांना त्यांची सहा वर्षाची मुलगी वैष्णवी खेळता खेळता तोल जाऊन गरम असलेल्या तेलाच्या कढाईत जाऊन पडली.
हा प्रकार तिचे वडिल समधान जावरे यांच्या लक्षात येताच त्यांनी तिला कढाईतून बाहेर काढले. त्यानंतर भाजलेल्या वैष्णवीला तिच्या वडिलांनी स्थानिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केल्यानंतर तिला अधिक उपचारासाठी नाशिक येथे खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. काल या प्रकरणी सटाणा पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640953932187942915?t=lhyItlvAt9I3yEt_Qfu2tg&s=19