सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील चावडी चौकात धावत सुटलेल्या दोन वळुंनी दुचाकीवर जाणाऱ्यांना जोरदार धडक दिली. त्यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. भर बाजारात हा प्रकार अचानक घडल्याने परिसरात एकच धावपळ उडाली. हा सर्व प्रकार दिकानाबाहेर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथे लहान बाळाला कडेवर घेऊन एक महिला उभी होती. वळू धावत येत असल्याचे दिसताच ती बाजूला असलेल्या एका शेडमध्ये गेली. त्यामुळे दोघे मायलेक वाचले. जर क्षणाचाही विलंब झाला असता तर कदाचित मोठा अनर्थ घडला असता.
काळजाचा ठोका चुकविणारी ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या अगोदर देखील अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
? बापरे!
*सटाण्यात वळूंचा थरार…*
दुचाकीला धडक..
एक गंभीर जखमी…
बघा हा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ?
https://t.co/64I8x9PJ30#indiadarpanlive #nashik #satana #bull #accident #1injured #video pic.twitter.com/fDSvoM8URY— India Darpan Live (@IndiaDarpanLive) April 16, 2023
Nashik Satana Bull Accident 1 Injured Video