नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी आनंदवार्ता आहे. राज्यातील सर्वच महसूली शहरांमध्ये मराठा समाजातील विद्यार्थी व विद्यार्थ्यांनीसाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेचे (सारथी) कार्यालय साकारले जात आहे. याच अंतर्गत नाशिक विभागीय सारथी कार्यालयाचे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या कार्यालयाचा विद्यार्त्य़ांना नेमका काय फायदा होणार आहे हे आपण आता जाणून घेऊ…
नाशिकमध्ये सहा हजार चौरस मीटर जागेत सारथीचे कार्यालय होणार आहे. त्र्यंबकरोडवरील पंचायत समिती कार्यालयाच्या मागील बाजूस सारथी कार्यालयाला जागा देण्यात आली आहे. सारथीच्या इमारतीचे काम पूर्ण होण्यासाठी सुमारे तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत सारथीचे तात्पुरते विभागीय कार्यालय नाशिकरोड येथे सुरू झाले आहे. त्र्यंबकरोडवर होणाऱ्या सारथी संकुलामध्ये अभ्यासिका, मुले व मुलींसाठी वेगवेगळे वसतीगृह तसेच विविध प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहेत.
मराठा समाजाच्या विविध मागण्या मंजुर व्हावेत यासाठी गेल्या काही वर्षांपासून मराठा समाजातील नेते प्रयत्नशील आहेत. छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास ( सारथी ) संस्थेचे केंद्र फक्त पुणे येथेच होते. या संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासिका,वसतीगृह आणि इतर प्रशिक्षण दिले जात असते. यासाठी राज्यभरातील विद्यार्थ्यांना पुणे येथील सारथी केंद्रात प्रवेश घ्यावा लागत असल्याने विद्यार्थ्यांची मोठी कुचंबणा होत आहे. सारथीचे केंद्र राज्यातील सहाही मुख्यालयी शहरांमध्ये व्हावे अशी मागणी होत होती.
छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास पुणे या संस्थेचे नाशिक या महसुली शहरात केंद्र उभारणीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. नाशिक शहरातील त्र्यंबकरोडवर असलेल्या पंचायत समिती कार्यालयाजवळील सव्हें १०५६, १०५७ एक मधील ०.६० हेक्टर म्हणजेच सहा हजार चौरस मीटर भोगवटादार दोन या शासकीय जागेवर सारथीचे केंद्र उभारण्यात येणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे आता नाशिक विभागातील म्हणजेच नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यातील आदिवासी समाजातील आर्थिक मागास विद्यार्थ्यांना शिक्षण, प्रशिक्षण घेण्यासाठी पुणे येथील सारथी कार्यालयात जाण्याची गरज पडणार नाही. पुणे येथील सारथी केंद्राच्या धर्तीवरच नाशिक येथे सारथी केंद्र उभारण्यात येणार असून पुणे सारथी केंद्रात असलेल्या सर्व सोयी -सुविधा या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.
Nashik Sarathi Office Maratha Students Benefit
Training Centre