नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तुम्ही जर उद्या सप्तशृंग गडावर देवी भगवतीच्या दर्शनासाठी जाण्याचा विचार करीत असाल तर थांबा. कारण, उद्या म्हणजे, बुधवार, १९ जुलै रोजी घाटाचा रस्ता बंद ठेवला जाणार आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी विशाल नरवाडे यांनी आदेश काढले आहेत.
सप्तश्रृंगी घाटात एसटी बसचा १२ जुलै रोजी मोठा अपघात झाला. ही बस थेट ३०० फूट दरीत कोसळली आहे. या अपघातात १ महिला प्रवासी ठार झाली असून २१ प्रवाशी जखमी झाले होते. ही बस दरीतून काढण्यासाठी बुधवार दि. १९ जुलै रोजी सप्तशृंगी गड ते नांदुरी हा रस्ता बंद ठेवला जाणार आहे. अपघातग्रस्त वाहन काढण्यासाठी हा रस्ता बंद राहणार असल्याने गडावर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ शकते. त्यामुळे भाविकांनी दर्शनाला जातांना याबाबत माहिती घेऊन बुधवारी दर्शनाला जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या वाहतूक बंद बाबत सविस्तर माहिती देणारे उपविभागीय अधिकाऱ्यांचे पत्र असे