नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आपल्याला मंत्री पदाची कुठलीही हाव नाही. ज्या वेळी आरक्षणाचा आपण राजीनामा देऊन सभेला उपस्थित होते. त्यामुळे आपल्याला मंत्री पदाची फिकीर नाही. प्रश्न मंत्री पदाचा नाही प्रश्न तुमच्या अस्मितेचा आहे. आपल्या न्याय हक्कासाठी लढा देणारा सहभाग आपल्याला हवा आहे. आपण सभागृहात तर आवाज उठवू तसेच रस्त्यावर उतरून देखील लढाई लढू केवळ राज्यात नाही तर देशभरात आपण आवाज उठवून ओबीसींचा एल्गार पुकारणार आहोत त्याला आपल्याला सर्वांची साथ हवी आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक आज छत्रपती संभाजीनगर रोड येथील जेजुरकर लॉन्स नाशिक येथे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीच्या प्रारंभी महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पांडुरंग अभंग, शिवाजीराव नलावडे, मुस्लिम ओबीसी समाजाचे नेते शब्बीर अन्सारी, डॉ.कैलास कमोद,ॲड. सुभाष राऊत, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापू भुजबळ, ईश्वर बाळबुधे, सत्संग मुंडे, महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरी धाडगे, प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, नवनाथ वाघमारे, गोरख बोडके, विभागीय अध्यक्ष प्रित्येश गवळी, पार्वतीताई क्षिरसाठ, अनिताताई देवतकर,ॲड.मृणाल ढोले पाटील, ॲड.मंगेश ससाणे, राजाराम पाटील, पंढरीनाथ थोरे, डॉ.स्नेहा सोनकाटे, अनिल निकम, सपना माळी, सुनील मेटे, शंकरराव लिंगे, दीपक बोराडे, पांडुरंग मिरगळ, ॲड.राजेंद्र महाडोळे, नवनाथ ढगे, राजाभाऊ सोनार, समाधान जेजुरकर,डॉ.योगेश गोसावी,प्रा.ज्ञानेश्वर दराडे, कविता कर्डक, अंबादास खैरे,योगिता आहेर, मुकुंद बेनी, यांच्यासह विविध समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर राज्यासह आहेत देशभरातून लोकांचे मला फोन मॅसेज येत आहे. मतदारसंघातील जनता धक्क्यात आहे. त्यांची आपण समजूत काढत आहोत. सर्व समाज जागृत झाला आहे. कुणीही पेटवा पेटवी न करता शांततेच्या मार्गाने आपला निषेध व्यक्त करावा. महापुरुषांना देखील समाजात काम करत असताना त्रास सहन करावा लागला आहे. काही लोकांना समतेचे चक्र उलट फिरवायचे आहे. त्यांना आपला विरोध असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, आरक्षणाने सर्वच प्रश्न सुटतात असे नाही मात्र समाजातील वंचित घटकांना प्रवाहात आणण्यासाठी ते महत्त्वाचं आहे. आपण मराठा समाजाच्या आरक्षणाला आपण कधीही विरोध केला नाही. सभागृहात ज्या ज्या वेळी मराठा आरक्षणाचा प्रश्न उभा राहिला त्यावेळी आपण सर्वात प्रथम पाठिंबा दिला. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या ही सर्वांचीच मागणी आहे. ओबीसी मध्ये आरक्षण घेऊन दोन्ही समाजाचे प्रश्न सुटू शकणार नाही. त्यामुळे वेगळं आरक्षण देण्याची मागणी आहे. आपण मराठा समाजाच्या विरुद्ध नाही. आरक्षणाच्या प्रश्नावर आपण कुणाशीही चर्चा करायला तयार आहोत. आपल्या विरुद्ध जे काम करताय त्यांच्या विरोधात आपल्याला लढायला हवं असे त्यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले की, आपला कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही. कुठल्याही वंचित घटकावर अन्याय होऊ नये हीच आपली भूमिका असून दलीत, आदिवासी मागासवर्ग यांनी सर्वांनी एकत्र राहायला हवे असे सांगत हम एक है तो सेफ है असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले काही लोक आपल्याबाबत वेगळा विचार करत आहे. त्यांना सांगायचे आहे की, लाडक्या बहिणींसोबत ओबीसी समाज घटकांनी महायुती सरकारला बहुमत मिळवून दिलं आहे. त्यामुळे आपल्याला गृहीत धरू नये असे त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले की,मंत्री मंडळात आपण असावं यासाठी मुख्यमंत्र्यांचा देखील आग्रह होता.आपला मंत्रिमंडळात सहभाग केलेला नसल्याने सर्वच पक्षातून आले. मंत्री पदाचा हा प्रश्न नाही. समाजाचे प्रश्न ज्यावेळी उभे राहतील त्यावेळी संरक्षणाची ढाल कोण उभी करणार असा सवाल उपस्थित करत अवहेलना करण्याचं शल्य मनामध्ये ढासत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार पांडुरंग अभंग, शिवाजीराव नलावडे, शब्बीर अन्सारी, डॉ.कैलास कमोद, ईश्वर बाळबुधे, डॉ.स्नेहा सोनकटे, सुनील मेटे,पार्वतीताई क्षिरसाठ, नवनाथ वाघमारे, राजेंद्र महाडोळे, ॲड.मंगेश ससाणे, बाळासाहेब कर्डक, दिपक बोराडे, पंढरीनाथ थोरे, राजाराम पाटील, राजाभाऊ सोनार, शंकरराव लिंगे, पांडुरंग मिरगळ, यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या बैठकीचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष बापू भुजबळ यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ.नागेश गवळी यांनी केले.
विविध संस्था संघटनांचा पाठिंबा
विदर्भ ब्राह्मण विकास मंच,ऑल इंडिया मुस्लिम ऑर्गनायझेशन, जयभीम ब्रिगेड, महाराष्ट्र राज्य विणकर समाज संघटना, महाराष्ट्र नाभिक मंडळ, महाराणा प्रताप क्षत्रिय समाज, आदिवासी, ब्राम्हण समाज यासह विविध संस्था संघटना आणि समाजाच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला.
घोषणांनी दुमदुमला जेजुरकर लॉन्स परिसर
यावेळी “भुजबळ साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है” ,”जनसेवेची एकच चळवळ छगन भुजबळ छगन भुजबळ”, “नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी”, “देश का नेता कैसा हो भुजबळ साहेब जैसा हो” अशा घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला होता.
हे फलक झळकले
संघर्ष योद्धा, जननायक, बहुजन नायक, ओबीसीचा बुलंद आवाज, ओबीसी योद्धा, बात सन्मान की है, झुकेगा नही, बाप माणूस यासह विविध फलक यावेळी समर्थकांकडून झळकावण्यात आले.यावेळी गेल्या ४० वर्षांपासून छगन भुजबळ साहेबांनी ओबीसी, दलीत वंचित घटकांसाठी योगदान दिलं आहे. आम्ही भुजबळ साहेबांवरील अन्याय सहन करणार नाही. महाराष्ट्राला छगन भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाची गरज असून त्यांच्या सहभागाशिवाय सरकार चालू शकणार नाही. ओबीसींच्या न्याय हक्कासाठी मंत्री मंडळात त्यांचं स्थान असणे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे भुजबळ साहेबांना सन्मानाने मंत्री पद देण्यात यावे. जिथे आपला सन्मान राखला जाईल तिथेच आपण काम करायला हवं. साहेब तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयाशी आम्ही एकमताने सोबत आहोत, अशा भावना यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.