शुक्रवार, नोव्हेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिकमध्ये होणाऱ्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात होणार हे सारे भरगच्च कार्यक्रम

ऑक्टोबर 27, 2021 | 12:56 pm
in इतर
0
20210130 184214 2

नाशिकच्या संमेलनात होणारे विविध कार्यक्रम

शुकवार, शनिवार, रविवार दिनांक ३, ४, ५ डिसेंबर २०२१ या तीन दिवसात ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कविवर्य कुसुमाग्रज नगरी, भुजबळ नॉलेज सिटी कॅम्पस्, आडगाव, नाशिक येथे आयोजित केले आहे. संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ व विज्ञान लेखक डॉ. जयंत नारळीकर व स्वागताध्यक्ष नाशिकचे पालकमंत्री मा. ना. छगनराव भुजबळ साहेब हे असतील.

संमेलनपूर्व गुरुवार दि. ०२ डिसेंबर २०२१ सायं. ७.०० वा. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन संमेलनस्थळी केले आहे. शनिवार ४ डिसेंबर २०२१ रोजी स्थानिक कलाकारांचा कार्यक्रम सायंकाळी होणार आहे. तसेच संमेलन समारोपाच्या दिवशी एक विशेष सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहे.

शुक्रवार दि. ०३ डिसेंबर २०२१ सकाळी ८.३० वा. ग्रंथqदडी कविवर्य कुसुमाग्रज प्रतिष्ठान, टिकळवाडी, नाशिक येथून निमाणी बस स्टँड पर्यंत पायी जावून तेथून बसेस द्वारा कविवर्य कुसुमाग्रज नगरी, भुजबळ नॉलेज सिटी कॅम्पस्, आडगाव, नाशिक येथे १ कि.मी. आधी पर्यंत पोहोचेल आणि तेथून परत पायी संमेलन स्थळापर्यंत जाईल. नंतर संमेलनस्थळी सकाळी ११.०० वा. ध्वजारोहणाचा कार्यक्रम महामंडळाचे तसेच संमेलन पदाधिकारी, स्वागत समिती सदस्य तसेच निमंत्रित साहित्यिक, रसिक आदींच्या उपस्थिती होणार आहे. दुपारी ४.०० वा. गं्रथ प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यानंतर संमेलनाचे उद्घाटन होईल. प्रथा व परंपरेनुसार स्वागताध्यक्षांचे भाषण, ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षांचा आणि उपस्थित संमेलनाच्या माजी अध्यक्षांचा सत्कार, ९३ व्या संमेलनाच्या अध्यक्षांचे मनोगत आणि नविन अध्यक्षांकडे अध्यक्षीय सूत्र प्रदान कार्यक्रम, उद्घाटकांचे भाषण, संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे भाषण होईल. सुरुवातीला स्वागत गीत, संमेलन गीत आणि अखेरीस आभार प्रदर्शन असेल.

रात्री ९ वा. निमंत्रित कवींचे काव्यसंमेलन होईल. या काव्य संमेलनासाठी सर्वश्री कवि दगडू लोमटे, सय्यद अल्लाद्दीन, रवि कोरडे, प्रिया धारुरकर, मनोज बोरगावकर, वैजनाथ अनमूलवाड, सौ. भाग्यश्री केसकर, नंदकुमार बालुरे, वाल्मिकी वाघमारे, इरफान शेख, किशोर बळी, दिनकर वानखेडे, अनिल जाधव, विजय शंकर ढाले, तीर्थराज कापकते, मनोज सुरेंद पाठक, विष्णु सोळंके, गजानन मानकर, मिनाक्षी पाटील, संजय कृष्णाजी पाटील, रामदास खरे, प्रविण बोकुलकर, गीतेश शिंदे, मनोज वराडे, वैभव साटम, गौरी कुलकर्णी, संगिता धायगुडे, विलास गावडे, अमोल qशदे, अजय कांदळ, विनायक कुलकर्णी, अविनाश चव्हाण, संजीवकुमार सोनवणे, विजय जोशी, अंजली बर्वे, प्रशांत केंदळे, दयासागर बन्ने, साहेबराव ठाणगे, प्रकाश होळकर, उत्तम कोळगावकर, संजय चौधरी, संदिप जगताप, मिलींद गांधी, रेखा भांडारे, विष्णु भगवान थोरे, कमलाकर देसले, राजेंद्र केवलबाई दिघे, सुषमा ठाकूर, किरण काशिनाथ, दिपा मिलींगकर, नीता शहा आदी कवींना निमंत्रित केलेले असून कवि श्रीधर नांदेडकर हे या कविसंमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत. या कविसंमेलनासाठी महाराष्ट्रातील कवि तर आहेतच शिवाय भोपाळ, गोवा आणि गुजरात या राज्यातील कवीही निमंत्रित आहेत.

त्यानंतर शनिवार दि. ४ डिसेंबर २०२१ रोजी डॉ. रामदास भटकळ यांची प्रकट मुलाखत डॉ. चंद्रकांत पाटील आणि श्री. दिलीप माजगावकर हे घेणार आहेत. याच दिवशी सकाळच्या सत्रात नाशिकचे ज्येष्ठ साहित्यिक श्री. मनोहर शहाणे आणि ग्रंथालीचे श्री. सुदेश हिगलाजपूरकर यांचा सत्कार संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचा हस्ते होईल. सत्कारानंतर संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे कथावाचन / कथाकथन असेल. याचदिवशी ‘संवाद लक्षवेधी कवींशीङ्क हा कार्यक्रमही होणार आहे. संवादक श्री. विश्वाभर देशमुख आणि गोqवद काबरेकर हे प्रफुल्ल शिलेदार, किशोर कदम, सुचिता खल्लाळ, खालील मोमीन आणि वैभव जोशी या कवींसमवेत संवाद साधतील.

परिचर्चा कार्यक्रम :
दि. ४ डिसेंबर २०२१ रोजी ‘स्मृतीचित्रे : लक्ष्मीबाई टिळकङ्क या विषयावर परिचर्चा असणार आहे. चर्चाकार प्रा. एकनाथ पगार हे असतील. यामध्ये श्रीमती सुहास जोशी, श्रीमती रेखा इनामदार साने, डॉ. गजानन जाधव आणि डॉ. मोना चिमोटे हे सहभागी असतील.

कथाकथन :
दि. ४ डिसेंबर २०२१ रोजी कथाकथनाचा कार्यक्रम श्री. विलास सिंदवीकर यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यावेळी सर्वश्री. गिरीश देसाई, विद्याधर बनसोड, बाबासाहेब परीट, राजेंद्र डाहळ यांस कथाकथनासाठी निमंत्रित केलेले आहे.

विविध परिसंवाद :
संमेलन काळामध्ये दि. ४ आणि ५ डिसेंबर २०२१ असे दोन दिवस मिळून विविध परिसंवादांचे आयोजन केले आहे.

परिसंवाद १ :
‘कोरोनानंतरचे अर्थकारण व मराठी साहित्य व्यवहारेङ्क – या विषयावर श्री. जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून त्यामध्ये सर्वश्री मकरंद कुलकर्णी, डॉ. आशुतोष रारावीकर, विनायक गोविलकर, डॉ. हंसराज जाधव आणि दीपक करंजीकर हे वक्ते म्हणून असतील.

परिसंवाद २ :
‘मराठी नाटक – एक पाऊल पुढे, दोन पावले मागेङ्क – श्री. शफाअत खान यांच्या अध्यक्षतेखाली होणाèया या परिसंवादामध्ये वक्ते श्रीमती लता नार्वेकर, सर्वश्री. पराग घोंगे, डॉ. सतीश साळुंके, सुबोध भावे आणि प्राजक्त देशमुख यांस निमंत्रित केले आहे.

परिसंवाद ३ :
‘शेतकऱ्यांची दु:स्थिती, आंदोलने, राजसत्ताचा निर्दयपणा, लेखक कलावंताचे मौन आणि सेलिब्रिटींची भूमिका ङ्क – श्री. भास्कर चंदनशीव यांच्या अध्यक्षतेखाली होणाèया या परिसंवादामध्ये आ. बच्चू कडू, श्री. रमेश जाधव, श्री. मिलींद मुरुगकर व श्री. संजय आवटे यांचा सहभाग अपेक्षित आहे.

परिसंवाद ४ :
‘ऑनलाईन वाचन : वाङमय विकासाला तारक की मारकङ्क – डॉ. दिलीप धोंडगे यांच्या अध्यक्षतेखाली होणाèया या परिसंवादामध्ये वक्ते म्हणून श्रृतीश्री वडगबाळकर, धनंजय गांगळ, श्रीमंत माने, डॉ. बिलास साळुंके, मयुर देवकर यांचा सहभाग अपेक्षित आहे.

परिसंवाद ५ :
साहित्य निर्मितीच्या कार्यशाळा : गरज की थोतांड – डॉ. निलिमा गुंडी यांच्या अध्यक्षतेखाली होणाèया या परिसंवादामध्ये वृषाली देशपांडे, डॉ. भगवान कारे, डॉ. वृंदा भार्गवे, इब्राहिम अफगाण, प्रा. भास्कर ढोके यांचा सहभाग असेल.

परिसंवाद ६ :
गोदातिरीच्या संतांचे योगदान – श्री. रामचंद्र देखणे यांच्या अध्यक्षतेखाली होणाèया या परिसंवादामध्ये श्रीमती धनश्री लेले, प्रा. विवेक अलोणी, चारुदत्त आफळे, डॉ. दत्तात्रय घुमरे, गीता काटे, बिशप थॉमस डाबरे यांस वक्ते म्हणून निमंत्रित केले आहे.

बाल साहित्य मेळावा :
साहित्य संमेलनाला जोडून यावर्षी प्रथमच बाल साहित्य मेळावा होत आहे. दि. ४ डिसेंबर २०२१ रोजी या मेळाव्याचे उद्घाटन सुप्रसिद्ध रंगकर्मी व लेखक श्री. दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते व अध्यक्षतेखाली होणार आहे. यामध्ये सर्वश्री सुर्यकांत मालुसरे, प्रा. पृथ्वीराज तौर, संजय पेंडसे, आश्लेषा महाजन, विनोद qसदकर, किरण भावसार, संदिप देशपांडे, संजय वाघ, प्रशांत गौतम व संतोष हुदलीकर यांचा सहभाग असेल.

कला प्रदर्शन :
संमेलनस्थळी नाशिकचे शिल्पकार, चित्रकार आदी कलाकारांचे वैशिष्ट्यपूर्ण असे कलाप्रदर्शनही तेथे आयोजित केले आहे.

नाशिक लेखक पुस्तक प्रदर्शन :
कुसुमाग्रजनगरीमध्ये सर्व रसिक नागरिकांच्या माहितीसाठी नाशिकच्या लेखकांचे पुस्तक प्रदर्शनही भरवले जाणार आहे.

कविकट्टा :
संमेलनस्थळी कविकट्ट्याचे आयोजन केले असून हा कविकट्टा सलग २ रात्री चालेल अशी अपेक्षा आहे. याचे संयोजन राजन लाखे, संदिप देशपांडे आणि संतोष वाटपाडे हे करणार आहेत.

नाशिक जिल्हा विशेष परिसंवाद :
नाशिक जिल्हा स्थापनेला १५० वर्ष झाली आहेत. या निमित्ताने नाशिक जिल्ह्याची वाटचाल, विकास व संकल्प या विषयावरील खास परिसंवाद जिल्हाधिकारी श्री. सुरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.

संमेलनाचा समारोप रविवार दिनांक ५ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता होईल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

हा आहे जिओचा सर्वात स्वस्त मन्थली रिचार्ज प्लॅन; डेटासह विनामूल्य कॉलिंगही

Next Post

लहान मुलांना दुचाकीवर घेऊन जाण्यासाठी आता नवे नियम

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
EcgM2 hWsAEnZLn

लहान मुलांना दुचाकीवर घेऊन जाण्यासाठी आता नवे नियम

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011