नाशिक – बांधकाम व्यवसायिक दिपक कल्याणजी चांदे हे नाशिक येथे ३ ते ५ डिसेंबर रोजी होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलसाठी २५ लाखाची मदत करणार आहे .रविवारी त्यांनी ५ लक्ष रकमेचा धानादेश साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगनराव भुजबळ, निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, निधी संकलन समिती प्रमुख रामेश्वर कंलत्री, सदस्य नंदकुमार सूर्यवंशी, सुभाष पाटिल शंकर बो-हाड़े संजय करंजकर. यांच्याकडे सुपूर्द केला.यावेळी ते म्हणाले की, हा नाशिकच्या साहित्य परंपरेला माझा सलाम आहे. या शहराची जडघडण होत असताना ती केवळ भौगोलिक होऊ नये तर ती सांस्कृतिक दृष्ट्या देखील व्हावी यासाठी मी ही मदत करतो आहे. यापुढेही काही मदत लागल्यास मी तत्पर असेन असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी २ व ४ डिसेंबर रोजी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा आर्थिक भार उचलला आहे. तसेच त्याच्या हॉटेलमधील १० रुम्स हे आलेल्या पाहुण्यांसाठी विनामुल्य देणार आहेत. त्याच बरोबर शहरात ज्या ज्या ठिकाणी कमानी उभारल्या जातील त्याचा अर्थिक भार देखील ते उचलणार असल्याचे त्यांनी कबुल केले आहे. याच बरोबर त्यांच्या फर्म मध्ये असलेली क़ांही वाहने ही संमेलनाच्या काळात प्रमुख पाहुण्यांसाठी देण्याची इछ्या व्यक़्त केले आहे.
नाशिकला धार्मिक परंपराच नाही तर सांस्कृतिक परंपरा देखील तितकीच महत्वाची आहे. कवी कुसुमाग्रजांपासून ते प्राजक्त देशमुखांपर्यंत अनेकांनी साहित्याच्या क्षेत्रात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. हिच परंपरा वृद्धींगत व्हावी यासाठी नाशिकमध्ये ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन ३ ते ५ डिसेंबर रोजी भुजबळ नॉलेज सिटी येथे करण्यात आले आहे. हे संमेलन एका संस्थेचे नसून तर ते संपूर्ण नाशिककरांचेच आहे या भावनेने अनेक नाशिककर हे संमेलन यशस्वी होण्यासाठी तन मन धना ने हातभार लावत असून चांदे यांनी सर्वात मोठी मदत केली आहे.