नासाकामुळे चैतन्य निर्माण होणार; प. पुज्य शांतिगिरी महाराज
नाशिक – जिल्ह्याला खासदार हेमंत गोडसेच्या रूपाने कतृत्वान नेतृत्व लाभले असून ९ वर्षांपासून बंद असलेला नाशिक सहकारी साखर कारखाना पुन्हा नव्या जोमाने सुरू होत आहे, हा आनंदाचा क्षण असून ४ तालुक्यातील शेतकरी वर्गाचे भवितव्य उज्वल असल्याचे प्रतिपादन प. पुज्य शांतिगिरी महाराज यांनी केले. मार्च २०२२ मध्ये जिल्हा बँकेच्या माध्यमातून नाशिक सहकारी साखर कारखान्याची सूत्रे खा. हेमंत गोडसे यांनी दीपक बिल्डर अँड डेव्हलपर्स या कंपनीच्या माध्यमातून हाती घेतल्यानंतर अवघ्या दीड महिन्याभरात २४ तास काम करून कारखाना मशिनरी दुरुस्ती केली आहे. कार्यक्षेत्रात सुमारे २५ हजार टन ऊस शिल्लक असल्याने तो तोडणे कामी शेतकऱ्यांची आग्रही भूमिका असल्याने खा. गोडसे यांनी चाचणी गळीत हंगाम घेण्याचा संकल्प केला. त्यानुसार ३ मे रोजी प. पुज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांचे हस्ते बॉयलार अग्नि प्रदीपादन केल्यानंतर काल शांतिगिरी महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजा करून गव्हाणीत मोळी टाकण्यात आली. यावेळी शांतिगिरी यांनी अतिशय प्रसन्न मनाने कारखान्याला आशीर्वाद देताना पळसे ही साधू संतांची भूमी असून कारखान्यामुळे परिसराचे भवितव्य उज्वल राहणार आहे.
प्रामाणिकपणाने सर्व घटकांनी कामे करून कारखाना उर्जितावस्थेत आणावा, या निमित्ताने शेतकरी व कष्टकऱ्यांची सेवा करावी व या कामी खासदार गोडसे व त्यांचे सहकारी निश्चित यशस्वी होतील, ज्याप्रमाणे खा. गोडसे यांनी दुसऱ्यांदा खासदार होण्याचा विक्रम केला. त्याचप्रमाणे बंद पडलेला कारखाना सुरू करून तो व्यवस्थित पुढे चालविण्याचा विक्रम देखील ते करणार असल्याचे सांगितले. खा. गोडसे यांनी प्रास्ताविकातून दीड महिन्यात कारखाना सुरू करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती देताना चाचणी गळीत हंगामात सर्वांनी सहकार्य करावे व तो यशस्वी करावा त्यानुसार, २०२२-२३ या हंगामाचे नियोजन देखील आत्ताच सुरू करीत असल्याचे सांगितले, कार्यकारी संचालक ए. व्ही. निकम यांनी कारखाना प्रशासन, व्यवस्थापन या विषयी माहिती देत सर्वांच्या सहकार्यातून हा गळीत हंगाम यशस्वी होणार असल्याचे सांगितले, तत्पूर्वी गव्हाण व काट्याची विधिवत पूजा दीपक चांदे, सागर गोडसे, भाग्यश्री गोडसे यांच्या हस्ते संपन्न झाली.
कार्यक्रमास अजिंक्य गोडसे, भक्ती गोडसे,, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक शैलेश पिंगळे, प्राधिकृत अधिकारी दीपक पाटील, मतीन बेग,कारखान्याचे कार्यकारी संचालक ए व्ही निकम,शेतकी अधिकारी जे जी जगतात, एस टी भोर,आर एम इरसुर, सुधाकर गोडसे, तन्मय सूर्यवंशी सह माजी चेअरमन तानाजी गायधनी, सरपंच सुरेखा गायधनी, उपसरपंच दिलीप गायधनी, लिलाबाई गायधनी, नवनाथ गायधनी, विलास गायधनी, विष्णुपंत गायखे अँड. सुभाष हारक, नारायण मुठाळ, अशोक आडके, विलास आडके, भाऊसाहेब गव्हाणे, रमेश गायकर, ज्ञानेश्वर काळे,नारायण मुठाळ, नामदेव बोराडे, माणिक कासार, माधव गायधनी,शरद पगार, शिवराम गायधनी, ,विष्णुपंत गोडसे,अमोल गोडसे,विजय गोडसे, गोरख खर्जुल आदीसह सभासद उपस्थित होते. कारखान्याचे दुरुस्ती व नुतानीकरनाचे काम परिश्रम शुगर टेक प्रा. लि. कंपनीचे CMD विशाल मोरे व त्यांचे सहकारी यांनी पूर्ण केले त्याचाही यावेळेस गौरव करण्यात आला.
गळीत हंगामाची तयारी सुरू करणार
कारखाना चालविण्याचे शिवधनुष्य सर्वांच्या आशीर्वादाने उचलले आहे,त्यामुळे ऊस उत्पादक, अधिकारी,कर्मचारी,उसतोडनी कामगार, वाहतूक दार या सर्वांची साथ फार महत्वाची आहे, कारखान्याचा चाचणी गळीत हंगाम यशस्वी करून पुढील २०२२-२३ गळीत हंगामाची तयारी सुरू करणार आहोत
-खा हेमंत गोडसे, नाशिक