मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील रेल्वे स्थानकातून जाणाऱ्या साकेत एक्सप्रेस रेल्वेच्या खाली येऊनही साधू बचावला आहे. या साधूच्या अंगावरुन संपूर्ण रेल्वे गेली. मात्र त्याने झोपून स्वतःला वाचवले. या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे, आज सकाळी साडे अकराच्या सुमारास मुंबई येथून जाणारी साकेत एक्सप्रेस फलाट क्रमांक २ वरून जात असताना अचानक हा साधू गाडी खाली आला. पण, हा साधू बचावल्यामुळे अनेकांना हा चमत्कार वाटला. पण, या अपघातात त्याने प्रसंगावधान राखून खाली झोपून घेतल्यामुळे तो बचावला आहे. बघा हा व्हिडिओ ….