नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मेजवानीचा परिपूर्ण आनंद देणाऱ्या दिमाखदार ऋतुरंग कला व सांस्कृतिक उत्सवाचे पुन्हा एकवार आयोजन करण्यात येत आहे. ’ऋतुरंग कला व सांस्कृतिक उत्सव’, कायमच रसिकांना भरभरून आनंद देणारा, त्यांना हवाहवासा वाटणारा एक सांस्कृतिक उत्सव! नव्हे तर आतुरतेने वाट पहाणाऱ्या रसिकांसाठी हा सोहळाच जणू. या कला उत्सवाच्या निमित्ताने विविध कलाकार एकत्र येतात. संस्कृती जपतात व कला विकसित करून आनंद घेतात.
दिनांक २० ते २२ जानेवारी, शुक्रवार ते रविवार दरम्यान नासिकरोड येथील ॠतुरंग भवन, दत्त मंदीर* येथे हा उत्सव होणार असून विविध कलांच्या या रंगतदार उत्सवामधे *दुपारी ३ ते रात्री ९ पर्यंत कलाप्रदर्शनांचे आयोजन करण्यात येणार आहे व सांस्कृतिक कार्यक्रम संध्याकाळी ६ ते ९ दरम्यान होतील.
सांस्कृतिक परंपरा आणि अभिजातता ह्यांचा संगम ही ऋतुरंगची ओळख. ह्या परंपरेला अनुसरून आयोजित करण्यात आलेल्या या उत्सवात विविध कला, साहित्य आणि संस्कृतीचा मिलाफ पहायला मिळेल.
नावाजलेल्या ज्येष्ठ आणि नवोदित कलाकारांनाही एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देणारा ऋतुरंग परिवार याहीवेळेस आपल्या परंपरेनुसार अनेक दिग्गज तसेच नव्या कलाकारांना घेऊन येत आहे. कलेच्या या उत्सवात,
वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शन
*आर्किटेक्ट सागर काबरा व विनय चुंबळे यांचे अनोख्या वस्तूंचे व मूर्तींचे प्रदर्शन*.
*आर्किटेक्ट नितीन कोकणे व डॉक्टर मिलिंद नेवे यांनी काढलेल्या दुर्मिळ पक्षांचे छायाचित्र प्रदर्शन*
*प्रदर्शनाची वेळ (तीनही दिवस) –*
*दुपारी 3 ते 9*
सांस्कृतिक कार्यक्रम:
*20 जानेवारी 2022*
*’मन’रंग*
मनाच्या विविध रंगांचे गीतांमधून उमटणारे प्रतिबिंब.
कलाकार:
प्रांजली बिरारी नेवासकर
संदीप थाटसिंगार आणि साथीदार
*21 जानेवारी 2023*
*द प्लॅन* ( *रॅंड वध* – *जॅक्सन वध*)
स्वातंत्र्य चळवळीच्या पडद्यामागील गोष्ट दाखवणारे नाटक
कलाकार:
*रॅंड वध*
भूषण महाले, आदित्य घलवार, सुयश देशपांडे, सूरज राजे जाधव
व
*जॅक्सन वध*
शंतनु अंबाडेकर, वैभव दुधकोहळे,
बद्रीश कट्टी/वरूण मोकासदार
*22 जानेवारी 2023*
*बॉलिवूड फ्युजन बॅंड*
उज्ज्वल अँड गौरव प्रोजेक्ट
कलाकार: गौरव कोरी, उज्ज्वल मिश्रा व साथीदार
*कार्यक्रमाची वेळ –*
*सायंकाळी 6 ते 9*
याच बरोबर:
— *नाशकातील कलाकारांचे वैशिष्ट्यपूर्ण चित्र प्रदर्शन*
— *सेल्फी पॉईंट*
— *लोककलांचा जागर*
व बरंच काही…
ऋतुरंग महोत्सवासाठी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्री दीपक चंदे प्रमुख प्रायोजक तसेच बिझनेस को ऑप बॅंक व प्रोग्रेसिव एज्युकेशन सोसायटी सहप्रायोजक आहेत. फुलझाडांच्या प्रदर्शनासाठी पपया नर्सरीचे सहकार्य आहे.
या कार्यक्रमांचा आस्वाद रसिकांना विनामुल्य घेता येईल.
कला, संस्कृती आणि साहित्याचा समन्वय साधणाऱ्या या आगळ्यावेगळ्या रंगारंग कला व संस्कृतीच्या उत्सवाचा रसिकांनी मोठ्या संख्येने आस्वाद घ्यावा असे आवाहन समस्त ऋतुरंग परिवाराने केलेले आहे.
Nashik Ruturang Art and Cultural Festival 2023