येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उभ्या गाडीतील डिझेल चोरी करणा-या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. येवला तालुक्यातील राजापूर येथून मुक्कामी असलेल्या बस तसेच पेट्रोल पंपावरील ट्रक मधून डिझेल चोरट्या विरोधात तालुका पोलिस स्थानकात गुन्हा दाखल होता.
या गुन्ह्याचा तपास करत असतांना तालुक्यातील चौघांच्या टोळीला अटक केली. त्यांच्या ताब्यातून डिझेल चोरी साठी वापरण्यात आलेली कार व डिझेल जप्त करण्यात आले आहे. येवला तालुका पोलिस याप्रकरणी अधिक तपास करीत आहे.
Nashik Rural Yeola Diesel Theft 4 Arrested