नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सोशल मिडियाचा वापर करणाऱ्यांना नाशिक पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांनी गंभीर इशारा दिला आहे. आज त्यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. आगामी काळात साजऱ्या होणाऱ्या सणांबाबत नाशिक ग्रामीण पोलिसांनी काय तयारी केली आहे तसेच अन्य बाबींविषयी पाटील यांनी माहिती दिली आहे.
पोलिस अधिक्षक सचिन पाटील म्हणाले की, आगामी काळात साजरे होणारे विविध सण-उत्सव, यात्रा तसे मुस्लिम बांधवांचा रमजान महिना सुरू आहे. गुरूवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ४० पोलीस ठाणे निहाय बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्राचे अर्धशक्तपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर चैत्र उत्सव असल्याने दहा ते १५ लाख भाविक दर्शनासाठी येतात. चैत्रोत्सवासाठीही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
याकाळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे. धार्मिक, सामाजिक तणाव निर्माण तसेच जातीय दंगे भडकावणाºया समाजकंटकांची ठाणेनिहाय यादी तयार करण्यात आली. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. तसेच आक्षेपार्ह्य मजकुर कोणी टाकल्यास त्यावर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. सोशल मिडीयावरअसे संदेश प्रसारित झाल्यास ग्रुप अॅडमिन सह अन्य सदस्यांवर कारवाई करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे.
https://twitter.com/SPNashikRural/status/1514243029972164612?s=20&t=KpMZKitXmLn9MjH2XrUC6w