नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक ग्रामिण पोलिस दलाच्या भरती प्रक्रियेचा अंतिम टप्पा सुरू झाला असून, रविवारी (दि.२) पोलिस शिपाई पदाच्या १६४ रिक्त जागांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची गंगापूररोडवरील केटीएचएम महाविद्यालयात सकाळी साडे सहा वाजता लेखी परिक्षा होणार आहे.
ग्रामीण पोलिस दलाच्या आस्थापनेवरील पोलिस शिपाई यांच्या १६४ रिक्त जागांसाठी दि.४ ते २० जानेवारी दरम्यान मैदाणी चाचणी घेण्यात आली होती. त्यातील उतीर्ण झालेल्या उमेदवारांची दि.१८ फेब्रुवारी रोजी यादी संकेतस्थळावर प्रशिध्द करण्यात आली असून संबधीतांना रविवारी होणा-या लेखी परिक्षेबाबत कळविण्यात आले आहे.
तसेच महाआयटी मार्फत ई मेल व एस.एम.एस द्वारे ही सुचना पारित करण्यात आल्या आहेत. संबधितांनी हॉल तिकीट, ओळखपत्र व दोन पासपोर्ट साईज फोटो सोबत घेवून रविवारी सकाळी साडे सहा वाजता परिक्षास्थळी हजर रहावे असे आवाहन पोलिस प्रशासनाने केली आहे.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640953932187942915?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1641369163737464832?s=20
Nashik Rural Police Recruitment Process