नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने पोलिस अधिक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शना खाली मोठी कारवाई केली आहे. जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच दिवशी आणि एकाचवेळी जिल्ह्यात विविध तब्बल ४६ ठिकाणी छापे टाकले आहेत. खासकरुन ही कारवाई अवैध गावठी दारु अड्डे उद्धवस्त करण्यासाठी होती.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, निफाड, सुरगाणा, पेठ, इगतपुरी, देवळा व सटाणा तालुक्यातील विविध अवैध दारु अड्ड्यांवर पोलिसांच्या विशेष पथकांनी छापे टाकले. दारुसाठी लागणारा काळा गुळ व नवसागरचा मोठा पोलिसांनी या कारवाईमध्ये जप्त केला आहे. एकाच दिवशी केलेल्या कारवाईं मध्ये जवळपास १० लाखाचे दारु, रसायन साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंतची ग्रामीण पोलिसांची ही मोठी कारवाई आहे.