नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी सैनिकाच्या खुनाचा उलगडा करण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या पथकाने या हत्येचा कसून तपास केला. आणि अखेर या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. हे हत्याकांड कसे घडले याचा उलगडाही त्यातून झाला आहे.
माजी सैनिकाचे खूनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात ग्रामीण पोलीसांना यश दिनांक ३०/०८/२०२२ रोजी सकाळी ०८:३० वा. चे पूर्वी छोटी पो.स्टे. हद्दीत आंबेवाडी गावचे शिवारात वन विभागाचे हद्दतील रस्त्यावर एक जळालेल्या चारचाकी कारमध्ये एका अज्ञात मनुष्य जातीचे अवशेष जळालेल्या स्थितीत मिळून आले होते. सदर बाबत घोटी पोलीस ठाणेस अकस्मात मृत्यू रजि. नं. ७२ / २०२२ सी. आर. पी. सी. १७४ प्रमाणे दाखल करण्यात आला होता.
सदर अ.मू. मधील जळालेल्या चारचाकी हुंदाई सॅन्ट्रो कारचे अवशेषावरून माहिती घेतली असता सदर कार ही संदीप पुंजाराम गुंजाळ, रा. न्हनावे, ता. चांदवड, जि. नाशिक यांचे मालकीची असल्याची माहिती मिळाली होती. सदर मृतदेहाची ओळख निश्चित करण्यासाठी डि. एन. ए. सॅम्पल घेण्यात आलेले होते. सदर अकस्मात मृत्यूचे चौकशीत प्राप्त रासायनिक विश्लेषणानुसार तसेच जाब-जबाबावरून सदर प्रकरणी घोटी पोलीस ठाणेस गुन्हा रजि. नं. ७७ / २०२३ भादवि कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यातील मयत संदीप पुंजाराम गुंजाळ हे माजी सैनिक होते व ते समृद्धी महामार्ग साउथ पोल, इगतपुरी येथे सिक्युरिटी चे काम असल्याची माहीती मिळाली होती. दिनांक ३०/०८/२०२२ रोजी मध्यरात्रीचे सुमारास ते साउथ पोल समृध्दी महामार्ग येथून त्यांची सॅन्ट्रो कार घेवून गेले होते व सकाळी ०८:३० वा. चे सुमारास जळालेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आंबेवाडी शिवारात मिळुन आला होता.
नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्रीमती माधुरी केदार कांगणे व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अर्जुन भोसले यांनी सदर घटनेबाबत दखल घेऊन वरील खूनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्यानूसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील यांचे पथकाने यातील मयत संदीप गुंजाळ हे सिक्युरीटी म्हणून काम करतअसलेल्या समृद्धी महामार्ग साउथ पोल, इगतपुरी या ठिकाणी भेट दिली. समृद्धी महामार्गाचे कामगार, सिक्युरिटीगाड् व ऑफीस स्टाफ यांना चेक करून मयत संदीप गुंजाळ यांचेबाबत विचारपूस करण्यात आली.
मयत हे नमूद तारखेस मध्यरात्रीचे सुमारास त्यांचेकडील हयुंदाई सॅन्ट्रो कार घेवून भावली धरण परिसराकडे गेले असल्याचे समजले होते. त्याप्रमाणे सदर कारचा मागोवा घेवून भावली धरण परिसरात माहीती घेतली असता घटनेच्या दिवशी मयत हा गाडी चालवीत असतांना त्याचे नांदगाव सदो येथील एका दुचाकीवरील इसमांशी कट मारल्याचे कारणावरून भांडण झाले असल्याचे समोर आले. त्यावरून नांदगाव सदो शिवारातून संशयीत नामे १) आकाश चंद्रकांत भोईर, वय २४, रा. नांदगाव सदो, ता. इगतपुरी व २) एक विधीसंपत, रा. नांदगाव सदो, ता, इगतपुरी यांना ताब्यात घेवून गुन्हयासंदर्भात सखोल चौकशी केली. आणि त्यांनी हत्येचा सर्व उलगडा केला आहे.
त्यांनी सांगितले की, सुमारे ०६ महीन्यांपूर्वी आम्ही समृध्दी महामार्गाचे पूलाखाली सर्कलजवळून नांदगाव सदो गावाकडे स्प्लेंडर गाडीने जात असताना समोरून एका सॅन्ट्रो कारने आम्हास कट मारला म्हणून त्यास आम्ही शिवीगाळ केली. त्यामुळे त्याने गाडी थांबवून खाली उतरून आम्हाला शिवीगाळ केली व आमच्यात भांडण झाले, त्यातून आम्ही त्यास चॉपरने पोटावर वार करून जखमी करून जीवे ठार मारले व त्यास त्याचे गाडीत टाकून भावली धरणाचे दिशेने घाटात जावून निर्मनुष्य ठिकाणी गाडी थांबविली. त्यावेळेस आम्ही त्यास ड्रायव्हर सीटवर बसवून त्याचे गाडीत असलेल्या डिझेल कॅन त्याचे अंगावर व गाडीवर ओतून देवून त्यास पेटवून दिले, अशी कबूली दिली आहे.
वरील खूनाचा गुन्हा उघडकीस आणणेसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील यांचे पथकातील पोहता गणेश वराडे, पोना संदीप हांडगे, भाऊसाहेब टिळे, प्रदिप बहिरम, हेमंत गिलबिले यांचे पथकाने मेहनत घेवून सदरचा क्लिष्ट स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणून मोलाची कामगिरी बजावली आहे. पोलीस पथकाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेवून पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी तपास पथकास २५,०००/- रु. वे बक्षीस जाहीर करून सर्वांचे अभिनंदन केले आहे.
Nashik Rural Police Crime Murder Investigation