नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोंदे (ता.इगतपुरी) येथील औद्योगीक वसाहतीत पिस्तूल बाळगणारे दोघे ग्रामिण पोलिसांच्या हाती लागले आहेत. संशयिताच्या ताब्यातून तिन देशी बनावटीचे पिस्तूल,चार जीवंत आणि एक रिकामे काडतुस हस्तगत करण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून याप्रकरणी वाडिवºहे पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल राजेंद्र सातपुते (३३) व अमोल सुकदेव भोर (२८ रा. दोघे गोंदे दुमाला ता.इगतपुरी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. गोंदे एमआयडीसीत फिरणारे दोघे काही तरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने अग्निशस्त्र घेवून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (दि.२२) रात्री सापळा लावण्यात आला असता संशयित पोलिसांच्या जाळ्यात अडकले. संशयितांच्या अंगझडतीत तीन पिस्तूल चार जिवंत आणि एक रिकामे काडतूस मिळून आले असून संशयितांपैकी सातपूते हा पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरूध्द खंडणीसह,दरोडा,दंगा आणि दुखापत अशी गंभीर गुन्हे दाखल आहे. संशयितांविरोधात वाडिवºहे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रविण मुसळे,पोलिस नाईक सचिन पिंगळ,विश्वनाथ आव्हाड व मंगेश गोसावी आदींच्या पथकाने केली.
Nashik Rural Police Crime Illegal Gun Seized