नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या रविवारी सटाणा येथे झालेल्या हत्येचा उलगडा झाला आहे. यासंदर्भात नाशिक ग्रामीण पोलिसांनी कसून तपास केल्याने अवघ्या चारच दिवसात हत्यारे पोलिसांना सापडले आहेत. नाशिक ग्रामीण पोलिसांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत या सर्व घटनेचा खुलासा केला आहे.
नाशिक ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सटाणा पोलीस ठाणे हद्दीत रविवारी (दि ०३) रोजी कंधाणे फाटा, मोरेनगर शिवारात हॉटेल गुरुकृपाच्या पाठीमागे मोकळ्या जागेत मयत धमजी रंगनाथ माळी, (वय ४५, सध्या रा. मोरेनगर शिवार, सटाणा, मुळ रा. पिंगळवाडे, ता.सटाणा) याचा मृतदेह मिळून आला होता. मयतास कोणीतरी अज्ञात कारणासाठी डोक्यात दगड घालून जिवे ठार मारले होते. सदर घटने बाबत सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणणेसाठी पोलीस पथकास मार्गदर्शन केले.
सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष अनमुलवार व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून मयत इसम नामे घमजी रंगनाथ माळी (वय ४५, सध्या रा. मोरेणगर शिवार, सटाणा) याचे दैनंदिन कामकाज व राहण्याचे ठिकाणाबाबत सविस्तर माहिती घेतली. तसेच मयत राहत असलेल्या आजुबाजूचे परिसरातील मयताचे कोणाशी वाद आहे। काय याबाबत गोपनीय माहिती घेवुन सदर गुन्हयाचे तपासात संशयीत नामे हिरामण नामदेव पवार, वय ४०, रा. मळगाव, ता.सटाणा, जि.नाशिक संध्या रा. कंधाणे फाटा, मोरेनगर शिवार, सटाणा याचे घर हे घटनास्थळापासून साधारण १५ फुट अंतरावर असतांना देखील तो व त्याचे कुटूंब हे उडवीचे उत्तर देत होते .त्यांच्या हालचाली देखील संशयास्पद वाटल्याने त्यास ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवून शनिवारी (दि २) रोजी रात्री १० ते ११ वा चे दरम्यान मयत घमजी माळी हा संशयिताच्या घरी गेल्याने त्यास पाहून त्याचा राग आला तो राग अनावर झाल्याने संशयित नामे हिरामण पवार याने मयताचे डोक्यात बाटली मारून त्यास खाली पाडले व त्यानंतर सदर ठिकाणी असलेला मोठा दगड उचलून तो मयत घमाजी माळी याचे डोक्यात टाकून त्यास जिवे ठार मारले असल्याची कबुली सशयिताने दिली.
सदर गुन्हयातील संशयित हिरामण नामदेव पवार (वय ४०, रा. मळगाव, ता. सटाणा, जि. नाशिक सध्या रा. कंधाणे फाटा, मोरेनगर शिवार, सटाणा ).यास वरील गुन्हयात अटक करण्यात आली.न्यायालयात हजर केले असता . त्य पोलीस कस्टडी रिमांड घेवून सदर गुन्हयाचा पुढील तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक सुभाष अनमुलवार हे करीत आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक .सचिन पाटील यांनी सदर गुन्हा उघडकीस आणणेसाठी केलेले मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष अनमुलवार, सपोनि किरण पाटील, पोउनि राहुल गवई, पोहवा कदम, जिभाउ पवार, शिंदे, पोना अजय महाजन, अतुल आहेर, विजय वाघ, निरभवणे, पोकों चोरे, शिंदे, मोरे, साळुंके, शेवाळे तसेच गुन्हे शाखा पोनि हेमंत पाटील यांचे पथकातील सपोउनि ज्ञानेश्वर शिरोळे, विठ्ठल बागुल, संजय पाटील, पोहवा नामदेव खैरणार, भगदान निकम, बापु पारखे यांचे पथकाने तपासाचे कौशल्य वापरून वरील खुनाचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे.