नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील रोटरी क्लब ऑफ नाशिकच्यावतीने रविवार (दि. ३) पासून कॅनडा कॉर्नर येथील बीएसएनएलच्या आवारात दर रविवारी शेतकरी बाजार आयोजित करण्यात येणार आहे. तशी माहिती नूतन अध्यक्ष सीए प्रफुल बरडीया यांनी दिली. यापूर्वी ऑरगॅनिक बाजार म्हणून ओळखला जाणारा रोटरी क्लबचा हा बाजार आता नव्या स्वरूपात शेतकरी बाजार म्हणून नाशिककरांच्या सेवेत दाखल होत आहे.
जैन एकता मंच आणि इनरव्हील क्लब यांच्या सहकार्याने हा बाजार नाशिककरांच्या अधिक पसंतीस उतरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या शेतकरी बाजाराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना घेता यावा यासाठी लोकाग्रहास्तव कॅनडा कॉर्नर येथील बीएसएनएलच्या आवारात या रविवार (दि. ३) पासून सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत बाजार आयोजित करण्यात येणार आहे. या शेतकरी बाजाराचे उदघाटन उद्यान पंडित डॉ. स्वप्नील बच्छाव यांच्या हस्ते आणि बीएसएनएलचे महाव्यवस्थापक नितीन महाजन यांच्या उपस्थितीत होणार आहे.
नाशिककरांना स्वच्छ, ताजा आणि उच्च दर्जाची फळे,भाजीपाला योग्य आणि माफक दरात उपलब्ध करून देण्यासाठी रोटरी क्लबने थेट शेतकऱ्यांशी संपर्क साधून भाजीपाला, फळे आणि धान्य ग्राहकांना उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला. या शेतकरी बाजाराचा आनंद जास्तीत जास्त नाशिककरांनी घ्यावा असे आवाहन सचिव ओमप्रकाश रावत, कम्युनिटी सर्व्हिस संचालक हेमराज राजपूत, जैन एकता मंचच्या अध्यक्षा शिल्पा चोरडिया, इनरव्हीलच्या अध्यक्षा धारा मालुंजकर, जनसंपर्क संचालक संतोष साबळे, रोटरी बाजार समन्वयक रफिक वोरा आदींनी केले आहे.
Nashik Rotary Club Sunday Farmer Bazaar from tommorrow