नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकरोड व्यापारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप करत काही उमेदवारांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यावर नोटा उधळत आंदोलन केले आहे. नाशिकरोड व्यापारी बँकेची निवडणूक प्रक्रिया न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू झाली असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशान्वये पोटनियम दुरुस्तीच्या निकषावरून ५६ अर्ज अवैध ठरवले आहेत.
मात्र यात भ्रष्टाचार झाल्याचे काही उमेदवारांचे म्हणणे असून यात मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपनिबंधक गौतम बालसाने यांनी पैसे घेत हे अर्ज बाद केल्याचा आरोप केला आहे. अर्ज बाद झालेले उमेदवार संतप्त होत सारडा सर्कलवरील डीडीआर ऑफिसला घेराव घालत अर्ज बाद का केले म्हणत जाब विचारला आहे.
लाचखोर तत्कालीन उपनिबंधक सतीश खरे याची पिलावळ अजूनही खात्यात असून त्यांनी पैसे घेत अर्ज वैध असताना अवैध ठरवल्याचा आरोप हेमंत गायकवाड यांनी केला आहे.
Nashik Road Vyapari Bank Election Agitation