नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नाशिककरांना मोठे गिफ्ट दिले आहे. आज ते नाशिक दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते तब्बल १८०० कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमीपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. यावेळी गडकरींनी घोषणा केली की नाशिकरोड ते द्वारका या दरम्यान डबलडेकर उड्डाणपुलाला मंजुरी देण्यात येत आहे. या कामासाठी १६०० कोटी रुपये लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
गडकरी यांनी भूमीपूजन केलेल्या प्रकल्पांमध्ये गोंदे ते पिंपरी सदो या दरम्यानच्या महामार्गाचे सहा पदरीकरण तसेच मुंबई -आग्रारोडवरील आडगाव शिवारातील दहावा मैल, जवळके फाटा तसेच नाशिक तालुक्यातील आंबेबहूला येथे बोगदा यांचाही समावेश आहे. यामुळे नाशिक-मुंबई दरम्यानच्या वाहतुकीची कोंडी टाळणार असून खान्देशातील प्रवाशांना समृद्धी महामार्गाला सहजपणे जॉईन होता येणार आहे. तर, बोगद्यांमुळे अपघात टळण्यास मोठी मदत होणार आहे.
गोंदे फाटा ते पिंपरी सदो या दरम्यानच्या रस्त्यावर सतत वाहतुकीची मोठी कोंडी होत असते. पिंपरी सदो पासून समृद्धी महामार्ग हा अगदीच हाकेच्या अंतर्गत आहे. त्यामुळे नाशिक – मुंबई दरम्यानच्या महामार्गाचे सहा पदरीकरण व्हावे यासाठी गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते. नासिक – मुंबई महामार्गावरील वाहतूक टाळण्यासाठी आणि धुळे , जळगाव, नंदुरबार येथील प्रवाशांना पिंपरी सदो शिवारातील समृद्धी महामार्गावर लवकरात लवकर पोहोचण्यासाठी गोंदे ते पिंपरी सदो या दरम्यानच्या रस्त्याचे सहा पदरीकरण होणे किती गरजेचे आहे.
या वेळी नाशिक रोड ते द्वारका चौक या मार्गावर ६ किलोमीटरच्या डबल डेकर उड्डाणपूल बांधणीस १६०० कोटी रुपयांसह मंजुरी दिली.#PragatiKaHighway#GatiShakti
— Nitin Gadkari (मोदी का परिवार) (@nitin_gadkari) December 18, 2022
गोंदे ते पिंपरी सदो या दरम्यानच्या रस्त्याचे सहा पदरीकरण करण्याचा निर्णय घेतला असून या कामासाठी सातशे कोटी रुपयांचा निधीला मंजुरी दिली आहे. महामार्गावरील आडगाव शिवारातील दहावा मैल येथे उड्डाणपुल तर जवळके फाटा आणि आंबे बहूला जंक्शन येथे बोगदयाना मंजुरी मिळालेली आहे. गोंदे ते पिंपरी सदो या दरम्यानच्या वीस किलोमीटर रस्त्याच्या सहा पदरीकरणाच्या कामाचा समावेश आहे. तसेच, दहावा मैल येथील उड्डाणपुल आणि जवळके फाटा आणि आंबे बहूला जंक्शन येथील भुयारी मार्ग तथा बोगद्यांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे. गोंदे ते पिपरी सदो दरम्यानच्या रस्त्याच्या सहा पदरीकरणासाठी सातशे कोटी तर दहावा मैल चौकातील उड्डाणपूलासाठी सुमारे ४५ कोटी, जवळके फाटा येथील बोगद्यासाठी ५५ तर आंबे बहूल्यासाठी ६० कोटी रूपयांचा निधी मंजूर झालेला आहे.
इगतपुरी (नाशिक), महाराष्ट्र में 1800 करोड़ रुपए की लागत वाली 8 राष्ट्रीय राजमार्ग परियोजनाओं का लोकार्पण एवं शिलान्यास। #PragatiKaHighway #GatiShakti pic.twitter.com/LwxHobty6F
— Nitin Gadkari (मोदी का परिवार) (@nitin_gadkari) December 18, 2022
Nashik Road to Dwarka Double Decker Flyover Sanction
Minister Nitin Gadkari Nashik Tour Development Project
Stone Laying Highway Infrastructure