नाशिक – येथील नाशिकरोड रेल्वे स्टेशनचा पूर्णपणे कायापालट होणार आहे. तुमचा विश्वास बसणार नाही अशा अत्याधुनिक टर्मिनलमध्ये नाशिकरोड रेल्वे स्टेशनचे रुपांतरण होणार आहे. अंतर्गत आणि बाह्य स्वरुप पूर्णपणे बदलल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच, अनेक अत्याधुनिक सुविधाही उपलब्ध होणार आहेत. यासंदर्भात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या संस्थेने यासंदर्भातील अहवाल संपूर्द केला आहे. बघा प्रस्तावित नाशिकरोड रेल्वे स्टेशनचे हे फोटो