नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकरोड रेल्वे स्थानकावर आरपीएफ जवानाने एका प्रवाशाचा जीव वाचवल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. प्लॅटफॅार्म क्रमांक दोनवर पवन एक्सप्रेसमध्ये रामहरी प्रजापती हा तरुण सामान टाकत असतांना ही गाडी सुरु झाली. त्यामुळे त्याचा तोल जात होता. याचवेळी आरपीएफ जवान केके यादव यांनी या तरुणाला वाचवले. हाच व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. (बघा व्हिडिओ)









