नाशिकरोड – देवळाली मतदार संघात आमदार सरोज आहिरे यांच्या माध्यमातून अल्पसंख्याक वस्ती रस्ते, कब्रस्तान संरक्षक भिंत व विविध विकास कामांसाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. भगूर-देवळाली दरम्यान असलेल्या नागझिरा नाल्यावरील पुलासाठी तब्बल एक कोटी रुपये मंजूर झाल्याने या भागातील मोठी समस्या सूटणार आहे.
देवळाली कॅन्टोंन्मेंट भागातील विविध विकास कामांसाठी पावणे तीन कोटी व मतदार संघातील विविध गावांतील अल्पसंख्यांक वस्ती, कब्रस्तान आदींसाठी सव्वा कोटी रुपये असे चार कोटी रुपये मंजूर झाल्याचे आमदार सरोज अहिरे यांनी सांगितले. जाखोरी १० लाख, लाखलगाव २० लाख, पिंप्री सय्यद १० लाख, पिंप्री सय्यद (अल्पसंख्यांक वस्ती रस्ता) १० लाख, पळसे १० लाख, देवळाली कॅम्प (कब्रस्तान संरक्षक भिंत) ४० लाख, नाशिकरोड येथील गुरुद्वारा परिसरात विविध विकास कामे करणे २५ लाखांचा निधी मिळून १ कोटी २५ लाख रुपये व देवळाली कॅन्टोंन्मेंट बोर्ड परिसरातील कामांसाठी पावणे तीन कोटी रुपये त्यात मुख्यता नागझिरा नाल्यावरील पुलासाठी १ कोटी, विजय नगर येथील रस्ते व परिसरातील कामांसाठी १ कोटी व इतर वॉर्ड मध्ये विविध विकास कामे घेण्यात आलेले आहे असे एकुण चार कोटींची विकास कामे मंजूर करण्यात आले आहे.