नाशिकरोड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– नाशिक शहर आणि जिल्ह्यातून गेल्या ऑगस्ट महिन्यापासून पुढील दोन वर्षांसाठी हद्दपार केलेल्या सराईत गुन्हेगारास नाशिकरोड येथील पालिकेच्या बिटको रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ नाशिक शहर पोलीसांच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने सापळा रचून रविवारी अटक केली. गोविंद संजय साबळे (वय २०) रा. भोर मळा, जुना ओढा रोड, सिन्नर फाटा असे या कारवाईत अटक केलेल्या हद्दपार गुन्हेगाराचे नाव असून त्याच्या विरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संजय साबळे हा सराईत आणि हद्दपारीत गुन्हेगार शहरात बिटको रुग्णालयाच्या परिसरात आलेला असल्याची माहिती पोलीस हवालदार प्रकाश भालेराव यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या पथकातील पोलीस हवालदार प्रकाश भालेराव, शंकर काळे गुलाब सोनार, यादव डंबाळे आदींनी सापळा रचून हि कारवाई केली.