नाशिकरोड – येथील जयभवानी रोड परिसरात सकाळी साडेसहाच्या सुमारास काही महिलांनी बिबट्याला बघितले. त्यानंतर काहींनी बिबट्या कॅमेरातही कैद केले. बिबट्या आल्याची माहिती सर्वत्र पसरल्यानंतर नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. या बिबट्यावर कुत्रे भुंकू लागल्यामुळे गर्दी जमा झाली होती. शिवसेनेचे राजेंद्र गायकवाड यांच्या पाठीमागे असलेल्या महानगरपालिकेच्या मोकळ्या जागेत हा बिबट्या दिसला. या बिबट्याचा व्हिडिओही समोर आला आहे….