नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सराफाचे दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी आठ लाखाचे सोने, चांदीचे दागिने लंपास केले. या चोरी प्रकरणी सागर विलास भावसार यांनी तक्रार दिली असून नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दुकानातून २६ नग सोन्याचे ओम पान, १५ नग सोन्याचे कानसाखळी, १५ नग सोन्याचे डोरले, १५ जोड सोन्याचे मुलांच्या कानातील टॉप्स, अंगठी, व चांदी दागिने असा सुमारे ८ लाख १७ हजार ८०० रुपये किंमतीचे दागिने चोरीला गेले. भावसार यांच्या श्री बालाजी ज्वेलर्स दुकानात ही चोरी झाली. सर्व जण शनिवारी रात्री दुकान बंद करून गेल्यानंतर मध्यरात्री ही चोरी झाली आहे.
रविवारी सकाळी दुकानात काम करणारा दर्शन दंडगव्हाळ आल्यानंतर ही चोरी झाल्याचे लक्षात आले. यावेळी चोरट्यांनी दुकानाचे शटर कुलूप तोडल्याचे समोर आले. श्री बालाजी ज्वेलर्स हे दुकान मुख्य रस्त्याच्या बाजूला असतांना ही चोरी झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गेल्या काही दिवसापासून चो-यांचे प्रमाण वाढले असल्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.