नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकरोड येथील कारागृहात बंदीवानावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित बंदीवान लघुशंकेसाठी गेला असता संशयित बंदीवानाने हा अनैसर्गिक अत्याचार केला. विजय रामचंद्र सोनवणे असे या संशयिताचे नाव आहे. गेल्या आठवड्यात ही घटना घडली. पीडिताने तुरुंग रक्षकाला हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांने याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर याप्रकरणी नाशिक रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना कारागृहातील सर्कल नंबर ५ मधील डायरेक्ट क्रमांक एकमध्ये घडली आहे. फिर्यादी न्यायबंदी शौचालयात लघुशंकेसाठी गेला असता संशयित सोनवणे यांनी त्याच्याशी अनैसर्गिक कृत्य केले. काही दिवसांपूर्वी मुंबई येथील ऑर्थर रोड जेलमध्ये आरोपींनी स्नानगृहात एका २३ वर्षीय कैद्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यात आता नाशिकमध्ये ही घटना घडली