नाशिक – नाशिकरोड येथील महापालिकेच्या बिटको हॉस्पिटलमध्ये तोडफोड झाल्याचा प्रकार समोर आला आहे. बिटको हॉस्पिल हे नाशिक महापालिकेचे सर्वात मोठे कोविड सेंटर आहे. याठिकाणी कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले जातात. तसेच, याठिकाणी सिटीस्कॅनसह विविध प्रकारच्या सुविधाही उपलब्ध आहेत. त्यामुळे या हॉस्पिटलच्या ठिकाणी नेहमीच मोठी वर्दळ असते. या हॉस्पिटलमध्ये नगरसेविकेच्यया पतीने तोडफोड केल्याची बाब समोर आली आहे. नगरसेवक पतीने थेट हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावर चारचाकी कार घातली आणि प्रवेशद्वाराची तोडफोड केली आहे. कारने प्रवेशद्वार तोडल्याने प्रवेशद्वारावर संपूर्णपणे काचांचा थर साचला आहे. तसेच, याचवेळी मोठा आवाज झाल्याने उपचार घेत असलेल्या रुग्णांसह त्यांचे नातेवाईकही घाबरले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे हॉस्पिटलच्या आवारात खळबळ उडाली आहे. ही तोडफोड का करण्यात आली, नक्की प्रकार काय आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला आहे.
बघा व्हिडिओ
https://www.facebook.com/watch/?v=1836983813137855