नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जाखोरी फाटा भागात दुचाकी घसरल्याने दहा महिन्यांच्या चिमुरडीची मृत्यू झाल्याची घटना घडली. ज्ञानेश्वरी अमोल वारूंगसे असे मृत बालिकेचे नाव आहे. आईच्या कुशीतून निसटल्याने ही घटना घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ज्ञानेश्वरीची आई गायत्री अमोल वारूंगसे (मुळ रा. सोनारी ता.सिन्नर हल्ली शिंदे गाव) या शुक्रवारी (दि.१६) आपल्या मुलीस सोबत घेवून भाऊ शुभम साहेबराव बेरड याच्या दुचाकीवर चांदगिरी येथे नातेवाईकांकडे गेल्या होत्या. सायंकाळच्या सुमारास बहिण भाऊ डबलसिट परतीचा प्रवास करीत असतांना ही दुर्घटना घडली. चांदगिरी येथून शिंदे गावाच्या दिशेने दोघे येत असतांना जाखोरी फाटा येथील शंकर मदिराजवळ वाहन आडवे गेल्याने शुभम यांनी अचानक ब्रेक लावल्याने हा अपघात झाला.
अचानक दुचाकी घसरल्याने गायत्री यांच्या कुशीत विसावलेली ज्ञानेश्वरी निसटली. या अपघातात ती रस्त्यावर पडल्याने तिच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. तिच्या नाकातून रक्त येवू लागल्याने बहिण भावाने तातडीने औषधोपचारासाठी बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी चिमुरडीस मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक पाटील करीत आहेत.