नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – व्दारका चौकात टँकरने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या सुनंदा चोरडिया (वय ५४, रा. अशोका मार्ग) यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. पहाटे हा अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या हाताला पायाला व डोक्याला गंभीर जखमा झाल्याने त्यांचे पती राजेंद्र चोरडिया यांनी त्यांना खासगी अॅम्ब्युलन्समधून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र सव्वा आठ वाजेच्या दरम्यान उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
या अपघात प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनंदा चोरडीया आपल्या पतीसमवेत अशोका मार्गावरील निवासस्थानाकडून ठक्कर बाझारकडे पहाटे ६.३० वाजता चालल्या होत्या. यावेळेस द्वारका चौकात त्यांना एका टँकरने जोरात धडक दिली. त्याचा त्या गंभीर जखमी झाल्या. या अपघातानंतर चालक घटनास्थळावरुन पळून जात होता. त्यावेळी राणेनगर परिसरात चालकास वाहनासह ताब्यात घेण्यात आले.
Nashik Road Accident Dwarka Women Death
Tanker