नाशिकरोड – डॅा. आंबेडकर रोडवर चार वाहने एकमेकावर जाऊन आदळल्याने झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाले. या अपघातानंतर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. दुपारी दोन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. शिवशाही बस, मारुती व्हॅन टॅक्सी, डंपर व सिटीलिंक बस या चार वाहनांचा हा विचित्र अपघात झाला. शिवशाहीबसने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून येणारे मारुती व्हॅन गाडी त्याच्यावर हादळली त्यानंतर डंपर गाडी गाडीची ठोस बसल्याने ही गाडी जाऊन आदळली. त्यानंतर पाठीमागून येणारे सिटी बस सुद्धा या गाडीवर जाऊन आदळली त्यामुळे चारही वाहन एकमेकावर जाऊन आढळले.
या अपघातानंतर नागरिकांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहतूकची कोंडी झाली. या अपघाताची माहिती मिळताच नाशिकरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश न्यायदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहतूक सुरळीत करून गर्दीला हटविले. अपघात इतका विचित्र होता की या अपघातात मारुती यांचा चक्काचूर झाला. अपघातानंतर ही व्हॅन बाजूला काढण्यासाठी क्रेन मागविण्यात आले. या अपघातात मारुती व्हॅन चालक गोकुळ पवार व राजाराम महाजन हे दोन जखमी झाले त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तब्बल एक तासानंतर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश मिळाले.