नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रेडिओ जगतामध्ये सर्वोच्च प्रतिष्ठेचा समजला जाणारा गोल्डन माईक RJ ऑफ द इयर अवॉर्ड नाशिक रेडिओ मिरची 98.3 च्या RJ भूषणला नुकताच जाहीर झाला आहे, या बद्दल समाज्याच्या विविध क्षेत्रातून त्याच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गेली 16 वर्ष भूषण नाशिक मध्ये रेडिओ मिरची वरती मॉर्निग शो होस्ट करतो, तो लोकांचा प्रचंड आवडता RJ आहे, त्याच्या शो मधून तो विविध सामाजिक आणि सांस्कृतिक विषयावर लोकांशी संवाद साधत असतो आणि मनोरंजन करता करता लोकांचे चे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो.
असे आहे अवॉर्ड चे स्वरूप
हा अवॉर्ड देशातील विविध रेडिओ स्टेशन तसेच विविध प्रादेशिक भाषा या सगळ्यातून उत्कृष्ट RJ म्हणून भूषणला जाहीर झाला आहे.
या पुरस्काराबद्दल प्रतिक्रीया देताना RJ भूषण म्हणाला की, “मी मिरची 98.3 च्या माध्यमातून करत असलेल्या कामाला आज ही मोठी पावती मिळाली आहे हा अवॉर्ड माझा नसून माझ्या सगळ्या श्रोत्यांचा आहे जे माझ्यावर मनापासून प्रेम करतात.
Nashik RJ Bhushan Matkari Golden Mike Award