नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चिमुकल्यांना वाढदिवसाचे मोठे अप्रुप असते. त्यामुळे अनोख्या पद्धतीने तो साजरा व्हावा, अशी प्रत्येक चिमुकल्याची इच्छा असते. खासकरुन त्यात केक, कपडे यांचाच अधिक समावेश असतो. मात्र, नाशिकच्या चिमुरडीने आपला वाढदिवस अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरा केला. त्यामुळेच सध्या तिची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.
येथील उद्योजक हेमंत राठी यांची ८ वर्षांची नात रिशा आनंद राठी हिने आपल्या वाढदिवशी कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या केस रोपणा करिता दान करण्याचा निर्णय घेतलेला. वर्षभरापूर्वी तिची आई डॉ. मेघा राठी हिने केस दान केले होते. ते पाहूनच स्वयंस्फूर्तीने रिशाने स्वत:चे 13 इंच लांबीचे केस कापले. आणि हे केस महिलांसाठी काम करणार्या हेअर फॉर होप इंडिया प्रोटेक्ट युवर मॉम एशिया या संस्थेस दान केले.
कॅन्सर रुग्णांच्या केमो उपचारानंतर केस झडतात. ही बाब रुग्णांचे मानसिक खच्चीकरण करणारी असते त्यांना या आजारावर मात करता येईल यासाठी प्रत्येकाने त्यांना मानसिक आधार देण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. रिशा आनंद राठी हिने आपले 13 इंच केस आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने संस्थेत दिले तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे यातुन बालपणातच सामाजिक कार्य करण्याची वृत्ती ही रिशाच्या अंगी दिसून येत आहे
Nashik Risha Rathi Celebrate Birthday in different Style