नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तुम्ही जर नाशकात घर खरेदी करण्यास इच्छुक असाल तर तुमच्यासाठी नामी संधी चालून आली आहे. कारण, येत्या २२ ते २५ डिसेंबर दरम्यान, नाशकात भव्य प्रॉपर्टी एक्सपो होत आहे. या एक्सपोच्या निमित्ताने नाशकातील शेकडो प्रकल्प एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.
सर्वसामान्यांच्या स्वप्नातील व वाजवीदराच्या घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको) तर्फे २२ ते २५ डिसेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ असे ४ दिवसांचे होमथॉन प्रदर्शन गंगापूररोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान येथे आयोजित करण्यात आले असून डोम उभारणीच्या कामाचे भूमिपूजन प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे चेअरमन दीपक चंदे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून झाले.
आपल्या स्वप्नातील घर व्हावे त्यांच्यासाठी हे प्रदर्शन म्हणजे एकप्रकारची पर्वणीच असून नाशिक, मुंबईसह नामवंत बांधकाम व्यावसायिकांच्या प्रॉपर्टीज एकाच छताखाली बघण्याची व ती खरेदी करण्याची संधी या प्रदर्शनामुळे त्यांना उपलब्ध होईल,अशी माहिती नरेडकोचे अध्यक्ष अभय तातेड आणि समन्वयक जयेश ठक्कर यांनी दिली.
हे प्रदर्शन ४ डोममध्ये उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले असून त्यात १०० हून अधिक स्टॉल्स असतील. बांधकाम क्षेत्रासाठी आवश्यक असलेली अत्याधुनिक साहित्ये यांये स्टॉल्सही येथे असतील कोणत्याही स्टोल वर घर बुक करणाऱ्यास लगेचच Naredco तर्फे चांदीचे नाणे भेट देण्यात येणार आहे.तसेच प्रदर्शनास भेट देण्यास येणाऱ्यांचीही नरेडको तर्फे लकी ड्रॉद्वारे एकास भेट मिळणार असल्याचेही तातेड आणि ठक्कर यांनी सांगितले.सह प्रायोजक म्हणून सिटी लिफ्ट, इन्व्हेरो,केनेस्ट यांचे सहकार्य मिळाले असून घर घेण्यासाठी युनियन बँक ऑफ इंडिया ही नरेडकोची बँकिंग पार्टनर असून एचडीएफसी आयसीआयसीआय, पंजाब नॅशनल बँक आदी बँकांतर्फे कर्जाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
भूमिपूजनप्रसंगी नरेडकोच्या नाशिक चे सचिव सुनील गवादे, सह समन्वयक शंतनू देशपांडे,राजन दर्यानी,मयूर कपाटे,श्रीहर्ष घुगे,अश्विन आव्हाड, युनियन बॅंकचे सहाय्यक महाव्यवस्थापक परमजीत सिंग, वास्तुविशारद संजय म्हाळस,भूषण राणे,कुलदीप चावरे,नंदन दीक्षित,भाविक ठक्कर, पुरुषोत्तम देशपांडे,प्रशांत पाटील,ऍड. पी.आर गीते,देवेंद्र अहिरे,भूषण महाजन,राजेंद्र बागड,नितीन चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
Nashik Real estate Property Expo Naredco