नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – डोंगरे वसतिगृह मैदानावर सुरू असलेल्या शेल्टर हे गृह प्रदर्शन खऱ्या अर्थाने गृहस्वप्न पूर्ती चा उत्सव ठरत आहे. एकच छताखाली उपलब्ध घरांचे ५०० हून अधिक पर्याय , विविध आकर्षक सवलती व ऑफर्स , गृहकर्जाचे आकर्षक दर यामुळे ग्राहकांना स्पॉट बुकिंग करणे सोपे जात आहे . या सोबतच येथे भेट दिलेल्या नागरिकांची घर घेण्याची प्रक्रिया पुढील काही महिन्यापर्यंत चालत असून अनेक जण साईट विजीट देखील करत आहेत .
प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी पर्यंत सुमारे २९००० नागरिकांनी प्रदर्शनास भेट दिली असून सुमारे १७५ सदनिकांची नोंदणी करण्यात आली आहे. यामुळे बांधकाम उद्योगात उत्साहाचे वातावरण असल्याचे प्रतिपादन क्रेडाई नाशिक मेट्रो चे अध्यक्ष रवी महाजन यांनी व्यक्त केला. घर ही मूलभूत गरजा पैकी एक असुंन स्वतः चे घर असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. याची पूर्तता बांधकाम व्यवसायिक स्वतः ची आर्थिक गुंतवणूक करून आपला अनुभव आणि कौशल्य वापरून पूर्ण करतो .क्रेडाई ही बांधकाम व्यवसायिक यांची देशपातळीवर काम करणारी सर्वात जुनी व विश्वासार्हता असणारी संस्था असून आपल्या सर्व सभासदांसाठी क्रेडाईने आदर्श नियमावली तयार केली आहे. सर्व नियमावली पाळून आणि ग्राहकास केंद्रबिंदू ठेऊन हे सर्व बांधकाम व्यवसायिक काम करतात. काही वर्षांपूर्वी आलेल्या रेरा कायद्यामुळे या क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले असून याचा लाभ देखील ग्राहकांना होत आहे असेही ते म्हणाले.
शेल्टर मधील या प्रतिसादाचे नाशिक च्या अर्थकारणात सकारात्मक परिणाम दिसतील असा विश्वास व्यक्त करून शेल्टर चे समन्वयक कृणाल पाटील म्हणाले की एका इमारतींच्या निर्माण प्रक्रियेमध्ये सुमारे ८९ विविध उत्पादनांचा तसेच १२ विविध सल्लागारांच्या सेवा चा उपयोग केला जातो. त्यामुळे अनेक व्यवसाय आणि रोजगार संधी निर्माण होतात. सदनिका निर्माणाधिन असताना आणि विक्री झाल्यानंतर देखील अनेक कुशल आणि अकुशल हाताना काम मिळते .त्यामुळे बांधकाम उद्योग का प्रत्येक शहरासाठी महत्त्वपूर्ण आहे असेही त्यांनी नमूद केले.
प्रदर्शनास भेट देणाऱ्या नागरिकात नाशिक जिल्ह्या आणि ठाणे , पुणे , जळगाव ,धुळे , औरंगाबाद यांचांदेखील समावेश असून भविष्यातील नाशिक मध्ये आज आलेली गुंतवणुकीची संधी साठी येथे उत्सुकता दिसत असल्याचे देखील कृणाल पाटील म्हणाले. प्रदर्शनास भेट देण्यासाठी क्यु आर कोड स्कॅन करून ऑनलाईन नोंदणी केल्यास कोणतेही शुल्क लागणार नसून याचा देखील सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन देखील क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे करण्यात आले आहे. प्रदर्शनास भेट देणाऱ्या मधून काही भाग्यवंत लकी ड्रॉ द्वारे निवडले जात असून दुसऱ्या दिवशी चे भाग्यवंत असे .
प्रथम – घोलप
द्वितीय – अजिंक्य पवार
तृतीय – निलेश महाजन
चतुर्थ – अनिल गुप्ता
पाचवे – आदित्य भालेराव
शेल्टर यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय क्रेडाईचे उपाध्यक्ष अनंत राजेगावकर , राष्ट्रीय क्रेडाईचे समिती प्रमुख [घटना] जितुभाई ठक्कर , महाराष्ट्र क्रेडाई चे सचिव सुनील कोतवाल तसेच माजी अध्यक्ष किरण चव्हाण , सुरेश पाटील , नेमीचंद पोतदार , उमेश वानखेडे यांचे मार्गदर्शन लाभत असून क्रेडाई नाशिक मेट्रो चे मानद सचिव गौरव ठक्कर , कोषाध्यक्ष हितेश पोतदार , सहसचिव अनिल आहेर, सहसचिव सचिन बागड तसेच कमिटी सदस्य नरेंद्र कुलकर्णी , नितीन पाटील, मनोज खिवंसरा , अंजन भालोदिया, अतुल शिंदे, सुशील बागड, राजेश आहेर, हर्षल देशमुख, श्रेणिक सुराणा, नरेंद्र कुलकणी, सागर शहा, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके हे कार्यरत आहेत.
Nashik Real Estate Expo Response Dream Home
Property Building