नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील रविवार कारंजा येथे असलेल्या सुप्रसिद्ध चांदीच्या गणपतीला तब्बल २१ किलो चंदन उटीचा लेप लावण्यात आला आहे. वाढत्या उष्णतेपासून गणरायाच्या मूर्तीचे संरक्षण व्हावे या उद्देशाने हा लेप लावण्यात आला आहे. विधीवत पुजा करुन आज हा लेप लावण्यात आला आहे.
नाशिक शहरातील तपमान ४०शी पार गेले आहे. त्यामुळे नाशिककर चांगलेच घामाघूम झाले आहेत. उन्हापासून बचावासाठी सर्वसामान्य नागरिक विविध प्रयत्न करीत आहेत. उन्हाच्या या तडाख्यापासून बचावासाठी देवांनाही संरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
रविवार कारंजा येथील चांदीच्या गणपती मंदिरात आज, रविवारी पहाटे मंदिरात चंदन उटी मोगरा महोत्सव साजरा करण्यात आला. एकेकाळी उन्हाळ्यातही थंड वाटणारे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकचे तापमान यंदा मात्र प्रचंड वाढत असल्याने उन्हाची दाहकता शहरात अनुभवयास येत आहे. वाढत्या उष्णतेपासून गणरायाच्या मुर्तीचे संरक्षण व्हावे, यासाठी सालाबादप्रमाणे यंदाही रविवार कारंजा येथील सिध्दीविनायकाला चंदनाचा लेप लावण्यात आला आहे. या उत्सवात २१ किलो चंदनाची उटी आणि ५० किलो मोगऱ्याचा समावेश आहे…
Nashik Ravivar Karanja Chandicha Ganpati Chandan Uti