नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्य नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर अपशब्द वापरून गलिच्छ भाषेत टीका करणाऱ्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली जोडो मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी “५० खोके एकदम ओके”, ईडी सरकारच करायचं काय खाली डोक वरती पाय, बेगानी शादी मे अब्दुला दिवाना यासारख्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. पोलीस कर्मचाऱ्यांनी पुतळा ताब्यात घेतल्या वर सरकार हमसे डरती है पोलीस को आगे करती है या घोषणा आंदोलकांनी दिल्या. यावेळी कोंडाजीमामा आव्हाड, नानासाहेब महाले, अर्जुन टिळे, अनिता भामरे, अंबादास खैरे, निवृत्ती अरिंगळे, संजय खैरनार, बालम पटेल, धनंजय निकाळे, सलीम शेख, महेश भामरे आदि पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेनेविरोधात केलेल्या बंडखोरीनंतर शिंदे गटावर सातत्यानं ५० खोके घेतल्याचा आरोप केला जात आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनीही टीका केली होती. सुप्रिया सुळेंच्या टीकेला राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अर्वाच्य भाषेत उत्तर दिल. बंडखोरी करणाऱ्या आमदारांनी गुवाहाटीला जाण्यासाठी ५० कोटी म्हणजे ५० खोके घेतल्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीही शिंदे गटातल्या आमदारांबद्दल “५० खोके एकदम ओके” असे संबोधले होते. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने सुप्रिया सुळेंनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर सत्तार यांना प्रश्न विचारला असता या वाक्याचा सूड घेत सुप्रिया सुळेंच्या टीकेबद्दल शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी कॅमेरासमोरच अश्लाघ्य शब्दात उत्तर दिले. या अपशब्दाच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक झाली असून याचा निषेध म्हणून अब्दुल सत्तार यांच्या पुतळ्यास जोडो मारो आंदोलन केले.
यावेळी विष्णुपंत म्हैसधुणे, भारत जाधव, आसिफ जानोरीकर, किशोर शिरसाठ, मकरंद सोमवंशी, राजाराम धनवटे, मनोहर कोरडे, शंकर मोकळ, नदीम शेख, प्रशांत खरात, नियामत शेख, योगेश निसाळ, साजिद मुलतानी, पूजा आहेर, योगिता पाटील, कुंदा शहाणे, रुपाली पठाडे, प्रतिभा चौधरी, संगीता घाडगे, जिजाबाई घोडेराव, संगीता पाटील, रुपाली तायडे, संगीता अहिरे, विद्या बर्वे, शादाब सय्यद, बाळा निगळ, जय कोतवाल, निखिल भागवत, मुकेश शेवाळे, निलेश भंदुरे, अमोल नाईक, डॉ. संदीप चव्हाण, संतोष भुजबळ, हर्षल चव्हाण, अक्षय पाटील, प्रविण बोराडे, विक्रम कोठुळे, साजिद मुलतानी, सागर लामखेडे, अजय पाटील, महेश शेळके आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी कडून अब्ब्दुल सत्तार यांना ५० सँडलचे खोके
अब्ब्दुल सत्तार यांनी मर्यादा सोडून टीका करणे व माफी मागणे हे त्यांच्या पदाला शोभत नाही न्यायालयात गुन्हा हा गुन्हाच असतो त्यावर माफी मागून शिक्षा कमी होत नसते. त्यामुळे राष्ट्रवादी कडून अब्ब्दुल सत्तार यांना ५० सँडलचे खोके पाठविणार आहोत.
रंजन ठाकरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी