सोमवार, ऑगस्ट 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिक रणजी सामना…पराभव वाचवण्याची बडोद्याला मिळाली संधी

by Gautam Sancheti
जानेवारी 26, 2025 | 1:04 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20250126 WA0031 1

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अगदीच मजबुत स्थिती असतांना देखील महाराष्ट्र संघाने बडोद्याविरुध्‍द सुरू असलेल्या रणजी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी किमान चहापानानंतर का होईना, परंतु आपला दुसरा डाव घोषीत न केल्याने आता सामना जिंकायचा असेल तर शेवटच्या दिवशी बडोद्याचा संपुर्ण संघ बाद करण्याची जादुई कामगिरी महाराष्ट्राच्या गोलंदाजांना करावी लागणार आहे. दिवसअखेर महाराष्ट्राच्या ७ गडी बाद ४६४ धावा झाल्याने आता महाराष्ट्राकडे ६१६ धावांची आघाडी जमा झाली असून उद्या सकाळी जर महाराष्ट्राने डाव घोषीत करून बडोद्याला संधी दिली तर शेवटच्या दिवशी विजयासाठी ६१६ धावांचे एैतिहासीक आव्हान बडोद्याला पेलावे लागेल किंवा आयतीच संधी मिळाल्याने एका गुणाच्या कमाई साठी हा सामना अनिर्णीत कसा राखता येईल? यासाठी प्रयत्न करावे लागतील.

पहिल्या डावाप्रमाणेच जर महाराष्ट्राच्या गोलंदाजीसमोर बडोद्याची पडझड झाली आणि दिवसभरात महाराष्ट्राला संपुर्ण बडोद्याचा संघ गुंडाळण्यात यश आले तर यावर्षी रणजी स्पर्धेच्या पहिल्या फेरीत गटामध्ये गुणांच्या तालिकेत आघाडीवर असलेल्या बडोद्याला स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी झगडावे लागेल असे एकंदर चित्र तयार झाले आहे.

दुसऱ्या दिवसाप्रमाणेच आज तिसऱ्या दिवशी देखील महाराष्ट्राच्या संघाची सामन्यावरची पकड मजबुत होती आणि त्याचे शिल्पकार होते ते म्हणजे शतकवीर सौरभ नवले, केवळ एका धावेने आपल्या घरच्या मैदानावर ज्याचे शतक हुकल्याने नाशिककर हळहळले अस नाशिकचा रामकृष्ण घोष
आणि कर्णधार ॠतुराज गायकवाड. या तिघांसमोर कृणाल पंड्या आणि त्याचे एकूण १० गोलंदाज साफ अपयशी ठरले. मितेश पटेल हा बडोद्याचा यष्टीरक्षक वगळता उरलेल्या १० खेळाडूंना पंड्याने आज गोलंदाज म्हणून आजमावून बघितले. विष्णू सोळंकी आणि शाश्वत पटेल या दोघांचा उल्लेख संघाच्या अधिकृत यादीत फक्त फलंदाज असा करण्यात आलेला आहे. परंतु, आज या दोघांनी मिळून लगभग १२ षटके गोलंदाजी टाकून बघितली. नाशिकच्या खेळपट्टीसोबत दोस्ती जुळलेल्या महाराष्ट्राच्या फलंदाजानी मात्र या सर्वापुढे हार मानलीच नाही आणि दिवसअखेर ७ गडी बाद ४६४ या धावसंख्येवर महाराष्ट्राचा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला.

सिध्दार्थ नवले हा यष्टीरक्षक फलंदाज पहिल्या डावात ८३ धावा काढून बाद झाला होता. शतक हुकल्याने झालेली निराशा सौरभने दुसऱ्या डावात पुर्णपणे भरून काढली. १४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने तो दिवसअखेर १२६ धावांवर नाबाद राहून परतला. नाशिकचा लाडका खेळाडू रामकृष्ण घोष याचे शतक मात्र अवघ्या एका धावेने हुकल्याने मैदानावर हळहळ व्यक्त करण्यात येत होती. विष्णु सोळंकीकडून त्याच्या यष्टी उडण्यापुर्वी त्याने १५ चौकारांच्या सहाय्याने १३४ चेंडून ९९ धावा केल्या. पहिल्या सत्रात कर्णधार ॠतुराज गायकवाडने धावफलक सतत हलता ठेवत अवघ्या ८३ चेंडूत ८९ धावा केल्या. अमित शेठच्या गोलंदाजीवर तो यष्टीरक्षक मितेश पटेलकडे झेल देवून परतला.

शनिवारी मैदानावरच्या खेळपट्टीतून फटका मारताना धूळ उडताना दिसत होती. तिसऱ्या दिवशी हळूहळू ही खेळपट्टी फिरकीसाठी अनुकूल वाटावी असे चित्र जाणवत होते. परंतु बडोद्याच्या फिरकी गोलंदाजाना याचा फायदा उचलता आला नाही. आता उद्या सामन्याचा शेवटचा दिवस असून मजबुत स्थितीत असलेला महाराष्ट्राचा संघ फिरकीच्या जोरावर सामना जिंकतो की सामना वाचविण्यात बडोद्याचे फलंदाज यशस्वी होतात हे सामन्याच्या शेवटच्या दिवशीच समजेल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींना आनंदी वार्ता समजेल, जाणून घ्या, रविवार, २६ जानेवारीचे राशिभविष्य

Next Post

विवाहीतेवर बळजबरीने बलात्कार…. पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

TeamLease Edtech 2
संमिश्र वार्ता

या स्टार्टअप्समध्ये फ्रेशर्ससाठी नोकरीच्या संधी: बघा, हा अहवाल

ऑगस्ट 25, 2025
Untitled 43
महत्त्वाच्या बातम्या

संगमनेरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रॅली व जाहीर सभा….दिला हा थेट इशारा

ऑगस्ट 25, 2025
rain1
संमिश्र वार्ता

या चार दिवसा दरम्यान मान्सून होणार सक्रिय…बघा, हवामान तज्ञांचा अंदाज

ऑगस्ट 24, 2025
image0015VMW e1756058042931
संमिश्र वार्ता

आसामला ६० वर्षांच्या भाडेतत्त्वावर मुंबईतील कुलाबा येथील भूखंड…केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची घोषणा

ऑगस्ट 24, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी अनावश्यक प्रवास टाळावा, जाणून घ्या, सोमवार, २५ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 24, 2025
WhatsApp Image 2025 08 24 at 16.34.15 1 1024x683 1
संमिश्र वार्ता

देशातील पहिल्या स्मार्ट व इंटेलिजंट सातनवरी गावाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रायोगिक तत्वावर शुभारंभ

ऑगस्ट 24, 2025
Screenshot 2025 08 24 190430.jpg
महत्त्वाच्या बातम्या

जागतिक तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्रातील मुलींची अभिमानास्पद कामगिरी

ऑगस्ट 24, 2025
manoj jarange 1
महत्त्वाच्या बातम्या

भाजपच्या एकाही आमदार, मंत्र्याला रस्त्यावर फिरु देऊ नका…मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

ऑगस्ट 24, 2025
Next Post
rape2

विवाहीतेवर बळजबरीने बलात्कार…. पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011