नाशिक – शहर व जिल्ह्यात आज मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी केली जात आहे. कोरोनामुळे गेले दोन वर्षे या सणावर सावट होते. पण, आज सर्वत्र उत्साह सकाळपासून दिसत होतो. शहरात ठीकठिकाणी सार्वजनिक रंगपंचमी उत्सव मंडळांकडून रंगपंचमी निमित्त रंगाचे शॉवर दिसतो होते. तर दुसरीकडे रहाडीत सुध्दा तितक्यात उत्साहात रंगपंचमी साजरी केली जात होती. सकाळ पासूनच शहर परिसरातील रहाडी मध्ये रंग आणि पाणी मिक्स केला जात होता.नरहाड उत्सव मंडळांकडून रहाड सजवून त्यात नैसर्गिक विविध रंग फुलांच्या पाकळ्या आणि मोठ्या प्रमाणावर पाणी टाकले गेले. सुरुवातीला विधिवत पूजा करुण या ऐतिहासिक रहाड उत्सवाला सुरुवात झाली. पोलिसांनी डीजे ला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे बँजोवर तरुणाई चांगलीच थिरकताना दिसत होती.