इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– गोदाकाठचं वैभव –
गोपिकाबाई
नाशिक च्या जडणघडण मध्ये ज्यांच्या मोलाच्या वाटा होता. अश्या महान व्यक्तींच्या कार्य परिचय वाचण्यासाठी आपली २ मिनटं द्या…
गोपिकाबाई यांनी नाशिक नगरीसाठी दिलेलं योगदान व त्यांचा संक्षिप्त कार्य परिचय….
१) रामकुंड:- बांधकाम श्री चित्रराव खटाऊ, सातारा यांनी सन १६९६ मध्ये केले.
रामकुंडाची दुरुस्ती गोपिकाबाई यांनी १७८२ मध्ये केली.
२) सीता कुंड बांधले
३) गोपिकाबाई तास बांधला
४) श्री काळाराम मंदिर बांधण्याची सूचना गोपिकाबाई यांनी श्री रंगनाथराव ओढेकर यांना केली होती.
५) श्री रामरायाला दोन्ही रथ गोपिकाबाई यांनी अर्पण केले.
६) प्रत्येक १२ वर्षांनी कुंभमेळा काळात उघडणारे गंगा-गोदावरी मंदिर सन १७७५ मध्ये गोपिकाबाईनीं बांधले.
इ.स. १७६१-१७७२ दरम्यानच्या काळात अनेक ज्ञात- अज्ञात कार्ये गोपिकाबाई यांनी नाशिकसाठी केले.
गोपिकाबाई यांचे नाशिकसाठी मोलाचे योगदान असून त्यामुळेच आपण सिटी सर्व्हे कार्यलयात नोंद असलेला “गोपिकाबाई बंगला” तोडण्यापासून वाचवला आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली.
शहरासाठी योगदान देणाऱ्या महान व्यक्तींची स्मृती स्थळ जतन करून संवर्धन करणे आपले आद्य कर्तव्य आहे.
~ गोदाप्रेमी देवांग जानी
रेफरन्स:- नाशिक गेझेटियर व पुराभिलेख दस्त…
Nashik Ramkund and Gopikabai History by Devang Jani