नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील अत्यंत प्रसिद्ध आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला श्रीराम रथोत्सव यंदा कधी निघणार १ एप्रिल की २ एप्रिल असा संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, आता यासंदर्भात स्पष्टता आली आहे.
यंदाच्या वर्षी साजरी होणारा राम रथ उत्सव तयारीसाठी पंचांच्यावतीने मारुती मंदिर पाथरवट लेन येथे बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीत राम रथ उत्सवात धुरीचे नियोजन, हनुमान जयंतीचे नियोजन तसेच समाजातील देखभाल दुरुस्तीचे नियोजन याबाबत चर्चा करण्यात आली राम रथ उत्सवात धुरीचे मानकरी यांची जबाबदारी, धुरीचे प्रमुख यांची नावे निश्चित करण्यात आली.
शनिवार दिनांक ०१ एप्रिल रोजी मालीवय चौक पाथरवट लेन ढिकले नगर काळाराम मंदिर पूर्व दरवाजा अशा मार्गाने राम रथ घेऊन जातात त्यावेळी राम रथाचे स्वागत करण्यासाठी भव्य सभा मंडप उभारून 200 मीटर लांबलचक रस्त्यावर दोन्ही बाजूने मंडप उभारून त्यावर तेथील निवासी सर्व नागरिकांच्या घरातून एक गुढी घेऊन मंडपावर उभारण्यात येणार आहे तसेच संपूर्ण रस्त्यावर रंग रांगोळी काढून ढोल ताशांच्या गजरात पारंपारिक पोशाखात श्रीराम रथाचे स्वागत केले जाणार आहे.
राम रथ मारुती मंदिर येथे पोहोचल्यानंतर उपस्थित सर्व मान्यवर तसेच रास्ते आखाडा तालीम संघ व श्रीराम रथोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी यांचा पाथरवट समाजातील जेष्ठ नागरिक यांचा वतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. तसेच हनुमान जयंती पारंपरिक पद्धतीने साजरी करून प्रसादाचे वाटप करणे बाबत या बैठकीत पंचांच्यावतीने सूचना देण्यात आल्या.
यंदाचा रामरथ कॅलेंडर प्रमाणे कामदा एकादशी शनिवार दिनांक ०१ एप्रिल रोजी दाखवत असली तरी पंचांगानुसार दोन एकादशी लागून आल्याने श्री काळाराम संस्थानच्या वतीने जाहीर कार्यक्रम नुसार दि.2 एप्रिल रविवार रोजी रथोत्सव साजरी होणार आहे. याबाबत सर्व राम भक्तांना सुचित करणे बाबत पंचांच्या वतीने सूचना करण्यात आली.
राम रथोत्सव व हनुमान जयंती साठी येणाऱ्या सर्व खर्चाचा लेखाजोखा मांडण्यात आला त्यानुसार दोनही उत्सव साजरे करण्यासाठी आवश्यक निधी उभारणे बाबत चर्चा करण्यात आली. तसेच सर्व राम भक्तांना रविवार दिनांक 2 एप्रिल रोजी पारंपारिक वेशभूषा मध्ये संध्याकाळी सहा वाजता श्रीकाळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथे उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यात आले..
बैठकीसाठी समाजातील पंचमंडळ सदस्य श्री सचिन लाटे, श्री नंदादीप मस्के, श्री नितीन शेलार रथोत्सव समितीचे माजी अध्यक्ष श्री राकेश शेळके, प्रतीक गवळी, राज जोशी, श्री सचिन मस्के, श्री दिगंबर शेळके, श्री रवी गोपाळे, श्री गणेश लाटे, श्री रोहित डावखर, श्री प्रकाश माळी, अमोल गवळी, विकी गवळी, श्री किरण जोशी, श्री अजित शेळके आदी सदस्य उपस्थित होते…
Nashik Ram Rathotsav Date Clarification