सोमवार, ऑक्टोबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिकचा रजनीश गायकवाड बनला आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन

जुलै 3, 2023 | 6:27 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20230703 WA0012 e1688388975100

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रजनिशने शैलेंद्र गायकवाड या नाशिकच्या युवा खेळाडूने गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येचा मुहूर्त साधत दैदिप्यमान यश मिळवलं आहे. आपल्या सर्व गुरुवर्यांना सातासमुद्रापार कझाकस्थान या ठिकाणी पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत आयर्न मॅन किताब जिंकुन खरीखुरी गुरुदक्षिणा दिली आहे. सरावातील कमालीचे सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन हा त्रिवेणी संगम आणि सुवर्ण कांचनयोग जुळून आल्याने रजनिश या आयर्न मॅन स्पर्धा 13 तास 47 मिनिटे अशा खूपच चांगल्या वेळेत यशस्वी पणे पूर्ण करून सदर स्पर्धेत आपल्या वयोगटात द्वितीय क्रमांकाचा किताब जिंकला आहे.

दुर्दम्य इच्छाशक्ती, कठोर परिश्रम. उत्तम नेतृत्व, संघबांधणी आणि अक्षय्य आशीर्वाद यांच्या पाठबळावर रजनीश शैलेंद्र गायकवाड याने आयर्न मॅन या एका अवघड स्पर्धेची तयारी सुरु केली होती. नाशिक शहराला डोंगरमाथ्यांची तटबंदी, पर्जन्यवृष्टीचे वरदान, चोहोबाजूंनी फळफळावळाचे वेढे यामुळे निसर्गदत्त लाभलेलं आल्हादायक वातावरण खेळाडूंना पोषकच! एकेकाळी थंड हवेचे ठिकाण अशीच ओळख असलेल्या नाशिक शहराला आता ‘विक्रमांचे शहर’ ही नवीन ओळख लाभलेली आहे .

आयर्न मॅन ट्रायथलॉंन
ही WTC म्हणजेच वर्ल्ड ट्रायथलॉंन कॉर्पोरेशन यांनी आयोजित केलेली स्पर्धा असून यामधे ३.८६ कि.मि.(२.४ माईल्स) पोहणे, १८०.२५ कि.मि. (११२ माईल्स) सायकलिंग आणि ४२.२० कि.मि.(२६.२२ माईल्स) धावणे याचा समावेश आहे.प्रचंड शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस लागणाऱ्या या आयर्न मॅन स्पर्धेला जागतिक स्तरावरील सर्वात कठीण एक दिवसीय स्पर्धा असे म्हणतात. बहुतांशी आयर्न मॅन स्पर्धेचा कालावधी हा १७ तासांचा मानला जातो आणि वेळेत पूर्ण करणे, हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य मानले जाते. अतिशय खडतर अशी ही स्पर्धा निर्धारित वेळेत पूर्ण करणे, हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य असते. जगभरात अनेक देशांमधे ‘आयर्नमॅन’ ही स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेत यश मिळविण्यासाठी जगभरातून अनेक ऍथलीट या स्पर्धेत भाग घेण्यासाठी दिवसरात्र झटत असतात. वयाची कोणतीही अट नसल्याने आज ‘स्त्री आणि पुरुष’ दोघेही या खेळाकडे आकृष्ट झाले आहेत, हे विशेष! आजही उत्तम नैसर्गिक ह्वामानाच्या सानिध्यात अनेकजण धावणे, सायकलिंग आणि पोहणे या तीन प्रकारात प्रामुख्याने नाशिक शहराचे नाव अग्रेसर ठेवण्यात व्यस्त आहेत, जी निश्चितच अभिमानाची, औत्सुक्याची आणि आशादायी बाब होय!

आज प्रत्येक खेळाडूला मोहवणारी ‘आयर्नमॅन’ ही स्पर्धाच मुळात एवढी खडतर असून मन आणि शरीर याचा कस पणाला लावणारी आहे की फार कमी स्पर्धकांना यात यश संपादित करता आलेले आहे. किमान नाशिक शहराला तरी ‘आयर्नमॅन’ या स्पर्धेचं आकर्षण निर्माण करण्यात याआधी आयर्न मॅन किताब मिळविणाऱ्या खेळाडूंचा फार मोठा सहभाग दिसून येतो. त्यात विशेषतः राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक पदी रुजू असलेले आयर्न मॅन डॉ रवींद्रकुमार सिंगल यांनी नाशिक शहराला आयर्न मॅन बाबत अधिक प्रचार आणि प्रसाराची भूमिका लाख मोलाची ठरते..

सुप्रसिद्ध संमोहनतज्ञ व समुपदेशक डॉ. शैलेंद्र गायकवाड व डॉ. सौ. मिनल गायकवाड यांचा सुपुत्र रजनीश याने आयर्नमॅन स्पर्धेत सहभाग घेण्याची प्रेरणा आयर्नमॅन डॉ. रविंद्र कुमार सिंगल(IPS) व आयर्नमॅन विजय काकड यांच्याकडून घेतली. वडील डॉ. शैलेंद्र गायकवाड यांच्यासोबत सराव करतांना रजनीशला आयर्नमॅन आश्विनी देवरे आणि डॉ. मनीषा रौंदळ यांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन मिळत गेले. गेल्या वर्षी याच कझाकस्थान या ठिकाणी आयोजित केलेल्या आयर्न मॅन स्पर्धेत नाशिक शहराचे नांव उंचाविणारे बॉश कंपनीत मुख्य सुरक्षा अधिकारी या पदावर कार्यरत असलेले आयर्न मॅन विजय काकड यांच्या यशाच्या प्रवासामुळे प्रभावित झाल्यामुळे रजनिशने यांच्याकडून या स्पर्धेत आवश्यक बाबींचा अभ्यास करून घेतला आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार साताऱ्याचे सुप्रसिद्ध कोच श्री शिव यादव यांच्याकडून या स्पर्धेकरिता प्रशिक्षण घेतले. रजनिश ने दररोज किमान दोन तास आणि शनिवार व रविवारी किमान 5 ते 6 तास स्विमिंग, सायकलिंग, रनिंग या व्यतिरिक्त योगासन, स्ट्रेनथ ट्रेनिंग असे खडतर प्रशिक्षण हे नित्यनियमाने पूर्ण केले.
आपल्या कॉलेजच्या शिक्षण व विविध सामाजिक कार्यात कार्यरत असूनही आयर्न मॅन साठी लागणाऱ्या सराव करण्यात रजनीशचा पुढाकार कौतुकास पात्र ठरतो.

रजनीश ने या आधी पूर्ण केलेल्या स्पर्धा पुढीलप्रमाणे –
1) कोल्हापूर बर्गमॅन – हाफ आयर्न मॅन
2) लोकमत नाशिक महामॅरेथॉन – २१ किलोमीटर
3) अंजनेरी अल्ट्रा ट्रेल
4) सप्तशृंगी हिल मॅरेथाॉन

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जळगाव आणि सांगलीत दुर्दैवी घटना… विजेचा शॉक लागून तिघांचा मृत्यू… वाचवायला गेलेला भाऊ जखमी

Next Post

सोलापूरला मिळणार तीर्थक्षेत्राचा दर्जा…. महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीचे उद्घाटन

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

हुश्श… नाशिक शहराने घेतला मोकळा श्वास… खडबडून जागे झालेल्या महापालिकेने केली एवढी कारवाई…

ऑक्टोबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस… जाणून घ्या, सोमवार, १३ ऑक्टोबरचे राशिभविष्य….

ऑक्टोबर 13, 2025
rain1
मुख्य बातमी

अरे देवा… राज्यात या तारखेपासून पुन्हा वादळी पावसाचा अंदाज…

ऑक्टोबर 13, 2025
rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
Next Post
123 1140x570 1

सोलापूरला मिळणार तीर्थक्षेत्राचा दर्जा.... महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीचे उद्घाटन

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011