नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राजस्थान येथील बूंदी राजघरान्याचे २६ वे वंशज वंश वर्धन सिंह चौहान यांचे नाशिक येथे आगमन झाल्यानंतर क्षत्रिय समाज फाउंडेशनच्या वतीने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. बूंदी राजघरान्याचे २६ वे वंशज महाराजा वंश वर्धन सिंह चौहान यांची नाशिक दौऱ्यावर असतांना क्षत्रिय समाज फाउंडेशनच्या कामकाजाबाबत माहिती घेतली. यावेळी क्षत्रिय समाज फाउंडेशनचे संस्थापक तेजपाल सिंह सोढा यांनी पुष्पगुच्छ देऊन महाराजा वंश वर्धन सिंह चौहान यांचे स्वागत केले.
यावेळी क्षत्रिय समाज फाउंडेशनचे वरिष्ठ रंजीतसिंह चुंडावत, वरिष्ठ तेजपाल सिंह शेखावत, उपाध्यक्ष विनोद सिंह शेखावत, सचिव सरवन सिंह शेखावत, पुष्पाल सिंह चुंडावत, नेपाल सिंह, राम सिंह, नरेंद्र सिंह, राम सिंह राजपूत, महेंद्र सिंह, राजेंद्र सिंह, शशांक सिंह, रोशन सिंह, अरविंद सिंह, अनिल कौशिक, जसवंत सिंह, दीप सिंह धनानी, बलवीर सिंह, गिरवर सिंह यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.