नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून ठाण मांडून असलेल्या पावसाने आज पहाटेपासून आणखी वेग घेतला आहे. त्यामुळे शहर परिसरात जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूरसह जिल्ह्यातील धरणांची पातळी लक्षणीयरित्या वाढली आहे. त्यामुळेच अनेक धरणांमधून सध्या पाणी सोडण्यात येत आहे. जिल्ह्यातील अनेक नद्यांना सध्या पूर आला आहे. गंगापूरमधील विसर्ग लवकरच वाढविला जाण्याची चिन्हे आहेत. परिणामी, गोदावरीची पाणी पातळी वाढणार आहे. याची दखल घेत गोदाकाठी प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सध्या धरणांमधून होत असलेला विसर्ग असा
दारणा – १०,५६२
मुकणे – १,४८६
कडवा – ५,००१
वालदेवी – ४०७
गंगापूर – १६०८
आळंदी – ४४६
भोजापूर – ९९०
पालखेड – ७,६८४
नांदूर मध्यमेश्वर बंधारा – ३६,७३१
होळकर पुलाखालून वाहणारे पाणी – २,३४९
(सर्व आकडे क्युसेक्समध्ये)
Nashik Rainfall Dam Water Discharge Flood