नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दोन वर्षांच्या कोरोना करावासानंतर जर कोणाचे जास्त नुकसान झाले असेल तर ते आहेत ‘विद्यार्थी’. विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे शिक्षक वृंदा साठी एक आव्हान होते, ते त्यांनी यशस्वी पेलण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांचा हा आत्मविश्वास अजून वाढावा,अभ्यासाची गोडी- मनोरंजनातून लागावी म्हणून येथील महाराष्ट्र समाज सेवा संघ नाशिक(द्वारा रचना विद्यालय) या संस्थेने राष्ट्र सेवा दल नाशिक शाखा यांचे संयुक्त विद्यमाने परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी दिनांक 19 ते 24 एप्रिल 2022 या कालावधीत “थोडी मस्ती थोडा अभ्यास” या उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.शिबाराचे उदघाटन संस्था अध्यक्ष श्री.सुधाकर साळी यांचे अध्यक्षतेखाली व मा.शिक्षणाधिकारी(नंदूरबार) श्री.मच्छिंद्र कदम यांचे प्रमुख उपस्थितीत दि.19 एप्रिल 2022 रोजी सकाळी 9-30 संपन्न होणार आहे.
या शिबिरात कार्टून काढणे, नृत्य, पथनाट्य, संगीतातून-गीतांकडे,खेळांतून इंग्रजी, प्रात्यक्षिकांतून गणित-भूमिती, मनोरंजनातून भाषा विकास, विविध खेळ,लेझीम,झांज इत्यादीचे प्रात्यक्षिकातून अभ्यास तसेच प्रसिद्ध वक्ते गौरी पटवर्धन(स्त्री-पुरुष समानता), संदीप भावसार(भारतीय संविधान), डॉ.निनाद चोपडे( प्रथमोपचार), सौ.पुष्पा चोपडे (आरोग्यभान),श्री महेंद्र दातरंगे(अंधश्रद्धा निर्मूलन प्रयोग), श्री अनिल माळी(नाशिक जिल्ह्यातील विविध पक्षी व त्यांचे अधिवास) या मान्यवरांचे बौद्धिक व्याख्यान होणार असून नाशिकच्या सुप्रसिद्ध सुगम संगीतकार कीर्तनकार सौ निर्मला अष्टपुत्रे यांचे संगीत मार्गदर्शन लाभणार आहे.
महाराष्ट्र समाज सेवा संघ संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री.सुधाकर साळी,उपाध्यक्ष श्रीमती हेमलता पटवर्धन, सचिव श्री शांताराम अहिरे,सहसचिव श्री पंकज पवार ,कोषाध्यक्ष श्री निरंजन ओक तसेच रचना माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ संगीता टाकळकर, राष्ट्र सेवा दल नाशिक शाखेचे सौ अलका एकबोटे, श्री वसंत एकबोटे,सौ.पुष्पा चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली शिबिर समन्वयक श्री निलेश ठाकूर, श्री यशवंत ठोके, सौ कीर्ती पाटील यांनी या शिबिराचे संयोजन केले आहे. निःशुल्क असलेल्या या शिबिरात विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.