मंगळवार, सप्टेंबर 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिक बनणार क्वालिटी सिटी; देशातील ५ शहरांपैकी पहिला सन्मान… या क्षेत्रात होणार प्रचंड फायदा

क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य विकास, स्वच्छता आणि शिक्षण यावर चळवळ

by Gautam Sancheti
मार्च 1, 2023 | 7:25 pm
in स्थानिक बातम्या
0
FqIz 6QWwAIInff e1677678907155

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कौशल्य विकास, स्वच्छता आणि शिक्षण या क्षेत्रांवर पहिल्या टप्प्यात भर असलेल्या ‘क्वालिटी सिटी नाशिक ‘ या चळवळीची आज घोषणा करण्यात आली. स्कील इंडीया अर्थात कौशल भारत कुशल भारत मोहिमेअंतर्गत क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया आणि नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या मार्गदर्शनाखाली ही चळवळ राबविण्यात येत आहे. या उपक्रमासाठी क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियासमवेत नाशिक महानगरपालिका, नाशिक जिल्हा परिषद, क्रेडाई नाशिक मेट्रो, नाशिक सिटीझन्स फोरम, श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान यांच्यात एक सामंजस्य करार (MOU) करण्यात येणार आहे.अशी माहिती नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, नाशिक जिल्हा परिषदेच्या सीईओ श्रीमती आशिमा मित्तल , क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष जक्षय शहा, एनएसडीसीचे सीईओ आणि एनएसडीसी इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक वेद मणी तिवारी व नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन चे संचालक जितेंद्र ठक्कर यांनी दिली .

देशातील शहरांच्या शाश्वत विकासाला गती देण्यासाठी तेथील मनुष्यबळाचा दर्जा आणि गुणवत्ता वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारी ही चळवळ नाशिकमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविली जाईल. ही चळवळ पथदर्शी स्वरुपात राहणार असून पुढे अन्य शहरांमध्येही तीचे अनुकरण केले जाऊ शकेल.
या उपक्रमासाठी देशात ५ शहरांची निवड करण्यात आली असून त्या शहरातील पहिला सन्मान हा नाशिकला मिळाला आहे. याचा लाभ नाशिक च्या समग्र विकासासाठी निश्चित होईल असा विश्वास खा. हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला.

एनएसडीसीचे सीईओ आणि एनएसडीसी इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक वेद मणी तिवारी म्हणाले, “क्वालिटी सिटी नाशिक चळवळीशी निगडीत असण्याचा आम्हाला मोठा अभिमान वाटतो कारण एनएसडीसीमध्ये दर्जेदार कर्मचारी वर्गाची निर्मिती करून कौशल्य विकासाला चालना देण्याचा आमचा प्रयत्न आहे. संबंधित कौशल्यांनी सुसज्ज या कौशल्य विकास कार्यक्रमाचा उद्देश घरगुती कामगारांना सशक्त करणे हा आहे, निश्चितपणे नाशिक हे अग्रेसर राहिल . शाश्वत विकास आणि कौशल्य आत्मसात केल्याने नाशिकचा दर्जा अधिकाधिक सुधारेल असा विश्वास वाटतो.”

नाशिक जिल्ह्यामध्ये कौशल्य विकास, स्वच्छता आणि शिक्षण हे चळवळीचे तीन प्रमुख उदिष्ट असून या साठी नाशिक महानगर पालिका , क्रेडाई नाशिक मेट्रो, सिटीझन्स फोरम, आयमा, निमा, असो ऑफ कन्सल्टिंग सिविल इंजी. , इन्स्टिट्यूट ऑफ इंडिअन इंटेरीयर डिझाईनर्स , आर्किटेकट अँन्ड इंजिनिअर्स , इंडिअन मेडिकल असो. , बिल्डर्स असो ऑफ इंडिया , नरेडको , कॉम्प्युटर असोसिएशन, नाईस, नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर, निता, लायन्स क्लब, रोटरी क्लब, आयसी एआय, फिक्की, महाराष्ट्र चेम्बर्स, तान, निपम, नाशिक स्कूल असोसिएशन, ICAI, (कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया), केमिस्ट असोसिएशन, रिक्षा चालक संघटना, इंस्टीट्यूशन ऑफ इंजिनियर्स, इंडिअन प्लंबिंग असो , नाशिक फर्स्ट , मी नाशिककर , इंडियन अॅकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स, असोचेम , कॉर्पोरेटर्स, को-ऑप बँक फेडरेशन, सामुदायिक संस्था, शासकीय / निमशासकीय विभाग – जिल्हा परिषद, एनएमसी, आदिवासी विकास, महसूल विभाग या सर्वांचे सहकार्य लाभणार आहे.

नाशिक शहरातील घरेलू कामगार, वाहन चालक, शिपाई आणि सुपरवायजर स्तरावरील व्हाईट कॉलर कर्मचारी यांच्या कौशल्य विकासाचा कार्यक्रम पहिल्या टप्प्यात हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी करण्यात येणाऱ्या सामंजस्य कराराचे उद्दीष्ट या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी परस्पर सहकार्याची क्षेत्रे शोधणे, विकसित करणे आणि कार्यान्वित करणे हे आहे. क्वालिटी सिटी नाशिक चळवळीअंतर्गत त्या-त्या क्षेत्रांमधली सध्याची परिस्थिती समजून घेण्यासाठी प्रत्येक क्षेत्राचे परिस्थितीजन्य विश्लेषण केले जाईल. त्यानंतर अडथळे आणि संभाव्य आव्हाने ओळखून त्यांच्यावर मात करणाऱ्या मॉडेलच्या रचनेसाठी आवश्यक असे मापदंड आखले जातील. त्यानुसार स्थानिक परिस्थितीच्या अनुषंगाने कृती आराखडा तयार करून आवश्यक तेथे अभ्यासक्रमांच्या दुरुस्तीसह अमंलबजावणी केली जाईल.

या सामंजस्य कराराअंतर्गत एक सुकाणू समिती स्थापन केली जाईल. ज्यामध्ये प्रत्येक संस्थेचे दोन सदस्य असतील. समिती सामंजस्य कराराची व्याप्ती आणि उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कार्यपद्धती विकसित करण्यावर अधिक विचार करेल. क्वालिटी सिटी नाशिकच्या सुकाणू समितीने शहरातील उद्योग, व्यापार, बांधकाम क्षेत्र, शिक्षण, सामाजिक अशा विविध क्षेत्रांतील संघटनांना या चळवळीत सहभागी करून घेतले आहे.

अशी राबविली जाणार चळवळ
अ] कौशल्य विकास
1. सुकाणू समितीने विशिष्ट क्षेत्राला प्रशिक्षण देण्यासाठी आणि प्रकल्प पुढे नेण्यासाठी संबंधित संघटनांशी संपर्क साधण्याचे काम
2. समिती सदस्यांनी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रासाठी स्वतःचे नामनिर्देशन करावे आणि त्यानुसार संबंधित असोसिएशनची बैठक घेण्याचे कार्य सुरू करावे.
3. बांधकाम कामगारांच्या संदर्भात क्रेडाई नाशिक मेट्रो, नरेडको आणि बिल्डर्स असो ऑफ इंडिया द्वारे स्किलिंग घेतले जाऊ शकते.

4. नाशिक सिटिझन फोरमचा पुरस्कार प्राप्त नगरसेवकांच्या माध्यमातून घरगुती कामगार जोडणे आवश्यक आहे. याशिवाय घरगुती कामगारांच्या उन्नतीसाठी आणि उत्थानासाठी काम करणाऱ्या सक्रिय स्वयंसेवी संस्थांना महिला बचत गट सारख्या जोडल्या जाऊ शकतात, सध्या महापालिकेत 1086 बचत गट नोंदणीकृत आहेत आणि प्रत्येक गटाखाली 10-12 महिला कार्यरत आहेत. संदीप कुयटे हे या कामाचे नेतृत्व करणार आहेत.

5. औद्योगिक कामगारांना वर्तणूक कौशल्ये, ग्रूमिंग, सॉफ्ट स्किल्स, आरोग्य आणि स्वच्छता यासाठी प्रशिक्षित करणे आवश्यक आहे हे उद्योग संघटनेद्वारे लागू केले जाऊ शकते.
6. व्हाईट कॉलर ट्रेनिंग:- एचआर असोसिएशन आणि निपम मानवी संसाधन प्रशिक्षणावर मध्यम-स्तरीय व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देऊ शकतात. व्हाईट कॉलर स्टाफवर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. तसेच कुरियर आणि डिलिव्हरी बॉय यांचाही विचार करता येईल.
7. फ्रंट लाइन हेल्थ वर्कर्स:- इंडिअन मेडिकल असो संबंधित प्रशिक्षण घेण्याचा मानस आहे . यामध्ये पॅरामेडिकल कर्मचारी आणि परिचारिकांचा समावेश आहे.

8. सध्या सेवा संघटन समिती आदिवासी भागातील आरोग्य आणि वैद्यकीय आवश्यकतांवर सरकारी योजना राबवत आहे आणि आदिवासी भागापर्यंत सरकारी सुविधा पोहोचतील याची खात्री करून घेत आहे.
9. ड्रायव्हर्स आणि शिपाई प्रशिक्षण :- हे स्थानिक संघटनांद्वारे लागू केले जाऊ शकते.
10. रिक्षा चालक प्रशिक्षण :- लायन्स , रोटरी आणि इतर स्वयंसेवी संस्थांमार्फत सुरक्षिततेबाबत जनजागृतीचा संयुक्त कार्यक्रम घेतला जाऊ शकतो.

ब] स्वच्छ शहर चळवळ
1. स्वच्छ शहर चळवळीत नाशिक प्रथम क्रमांकावर येण्याचा मानस आहे, यासाठी क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया मदत करण्यास तयार आहे, समन्वय साधून अंमलबजावणी सुरू करण्यात येईल .
2. नाशिक शहराला लागून असलेल्या दर्जेदार गावासाठी 5 गावे आदर्श गाव म्हणून घेणे ज्यात सावरगाव आणि गंघवरे सहित नवीन 3 गावे जोडली जातील.
3. गाव हिवरेबाजार मॉडेलचा अभ्यास केला जाणार आहे.

4. शालेय/महविद्यालये यांच्या विद्यार्थ्यांमार्फत स्वच्छतेबाबत जनजागृती
5 कचऱ्याचे पृथक्करण, विल्हेवाट आणि उपाय
6. वृक्षारोपण
7. जलसाठ्याचे संवर्धन आणि जीर्णोद्धार
8. हवा गुणवत्ता निर्देशांक सुधारणे आणि त्याचे अचूक मॅपिंग करणे.

क]. मिशन – शिक्षण
1. महानगरपालिका / जिल्हा परिषद शाळेशी समन्वय साधून विद्यार्थी गळती थांबवणे .
2. सी एस आर फंड द्वारे शाळा डिजिटल करणे.
3. शाळेत कौशल्याला प्रोत्साहन देणे
4. महानगरपालिका व जिल्हा परिषद, बजेट शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयास मान्यता

https://twitter.com/QualityCouncil/status/1630923191001698304?s=20

Nashik Quality City MOU NSDC Quality Council

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भाजपाची महाविजय -२०२४ अभियान संयोजन समिती घोषित; यांना मिळाली संधी

Next Post

जिंदाल कंपनीतील ‘त्या’ दुर्घटनेबाबत कामगार मंत्र्यांनी विधिमंडळात दिली ही माहिती

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Maha Gov logo 07 1 1024x512 1
राज्य

या योजनेच्या उपचारांची संख्या १३५६ वरून २३९९ पर्यंत वाढविण्यात येणार….मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सप्टेंबर 15, 2025
Untitled 21
संमिश्र वार्ता

बीड पुरात भारतीय लष्करी दक्षिण कमांडच्या थार रॅप्टर्स विमानदलाची जलद बचाव मोहीम

सप्टेंबर 15, 2025
CM
संमिश्र वार्ता

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा या तारखेपासून शुभारंभ….

सप्टेंबर 15, 2025
Untitled 20
संमिश्र वार्ता

नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आक्रोश मोर्चा…बघा, व्हिडिओ

सप्टेंबर 15, 2025
PETROL PUMP
संमिश्र वार्ता

टँकरमधून होणारी इंधन चोरी….पेट्रोल डीलर्स असोसिएशनने चोरीचा असा केला पर्दाफाश

सप्टेंबर 15, 2025
Untitled 19
स्थानिक बातम्या

नाशिकच्या केंब्रिज स्कूलमध्ये बॅाम्ब…शाळा प्रशासनाने दिली ही माहिती

सप्टेंबर 15, 2025
accident 11
क्राईम डायरी

नाशिकमध्ये वेगवेगळया अपघातात भरधाव वाहनांनी दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू

सप्टेंबर 15, 2025
SUPRIME COURT 1
महत्त्वाच्या बातम्या

वक्फ संशोधन कायद्याला आव्हान देणा-या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निकाल

सप्टेंबर 15, 2025
Next Post
FlZBIovaEAInIMJ

जिंदाल कंपनीतील 'त्या' दुर्घटनेबाबत कामगार मंत्र्यांनी विधिमंडळात दिली ही माहिती

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011