नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक-पुणे रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासाठी जिल्हाधिकारी गंगाधरण डी अतिशय आक्रमक झाले आहेत. त्यामुळेच भूसंपादन होत असलेल्या सिन्नर तालुक्यातील गावांना त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. तसेच, त्यांनी शेतकऱ्यांच्या अनेक शंकांचे त्यांनी निरसन केले.
त्याअनुषंगाने मा. जिल्हाधिकारी श्री. गंगाथरण डी. यांनी सिन्नर तालुक्यातील बारागांवपिंप्री, वडझिरे, पाटपिंप्री या गावांना भेटी देवुन तेथील शेतक-यांशी चर्चा करुन या प्रकल्पाचे महत्व पटवुन दिले आहे. रेल्वे मार्गा अतर्गत संपादित होणा-या जमिनीच्या प्रकारानुसार जिरायती, हंगामी बागायत व बारामाही बागायत यांच्या मिळणा-या मोबदल्या विषयी अवगत केले.
सदर जमिनीचा कायदेशीरदृष्टया देण्यात आलेला दर व परिस्थीती याबाबत पाहणी करुन शेतक-यांशी संवाद साधण्यात आल आहे. जिल्हा सामितीने जाहीर केलेले 8 गावातील दर हे कायदेशीरदृष्टया व नियमानुसार जास्तीत जास्त देण्याचा प्रयन्त केला आहे. त्यामुळे शेतकयांनी या संधी लाभ त्वरीत घ्यावा. अन्यथा पुढील पाच महिण्यात सक्तीने भुसंपादन कायद्याची प्रक्रिया सुरु करण्यात येईल. त्यामुळे सद्यस्थितीत शेतक्यांना आपल्या हिताचा विचार करुन या प्रकल्पास संमतीने जमीन हस्तांतरणास (खरेदी) सहभाग दर्शवावा अशी विनंती मा. जिल्हाधिकारी यांनी केली आहे.
महाराष्ट्रामध्ये पुणे आणि नाशिक हा सर्वात श्रीमंत औद्योगिक व कृषी पट्टा आहे. पुणे नाशिक दरम्यान नविन दुहेरी मध्यम उच्च वेगवान ब्रॉडगेज या रेल्वेमार्गामुळे रस्त्यावरील प्रवाशांची संख्या आणि वाहतुक कमी होईल. इतकेच नव्हे तर, यामुळे कमी इंधनाचा वापर होत असल्याने, दूषित वायूंचे प्रमाण कमी होऊन, चांगल्या वातावरणाची निर्मिती होते.
प्रस्तावित पुणे – नाशिक रेल्वे मार्ग महाराष्ट्रा मधील पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांमधून जाईल. प्रकल्प संरेखन चाकण, राजगुरुनगर (खेड), मंचर, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर आणि सिन्नर येथील महत्त्वाचे उद्योग, विशेष आर्थिक क्षेत्र आणि कृषी केंद्रांना जोडेल. या प्रकल्पांतर्गत सुमारे २३५ कि.मी. विद्युतीकरणासह ग्रीनफील्ड सेमी हायस्पीड रेल्वे डबल लाईन बांधण्याचे योजिले आहे. सुरक्षित आणि जलद मालवाहतूकीसाठी हा रेल्वे मार्ग फायदेशीर ठरेल.
या जलद रेल्वे मार्गामुळे अधिकाधिक प्रवाशांच्या वेळेची बचत होईल कारण दोन शहरांमधील प्रवास फक्त १ तास आणि ४५ मिनिटांत पूर्ण होईल. हा प्रकल्प नाशिक तालुक्यातील 5 गावे व सिन्नर तालुक्यातील 17 गावामधुन मार्गक्रमन होत असल्याने साहजिकच या भागाचा अभुतपुर्व विकास होण्यास मदत होणार आहे.
थेट खरेदीने जमीन दिल्यास होणारे फायदे
1. जिल्हास्तरीय समितीने निश्चित केलेल्या दराच्या ग्रामीण भागात 5 पट व नगरपालिका हद्यीत 2.5 पट दर मिळणार.
2. जमिनीच्या निगडीत घटक (बांधकाम, घर विहीर, पाईपलाईन, फळझाडे, वनझाडे,शेततळे) यांचे निश्चित केलेल्या मुल्यांकन रकमेवर 2.5 पट रक्कम अदा करण्यात येईल.
3. थेट खरेदीने खरेदीने जमीन दिल्यास भुधारकांस त्यांच्या बॅक खात्यावर 24 तासात मोबदला रक्क्म जमा करण्यात येईल.
4.थेट खरेदीने जमीन ताब्यात घेण्यासाठी जिल्हास्तरीय समितीने बाजारमुल्यांच्या 1.5 ते दुप्प्ट दरांना मान्यता दिलेली आहे.
भुसंपादन कायद्यानुसार संपादन केल्यास
1. निश्चित करण्यात आलेल्या दराचे ग्रामीण भागात 4 पट व नगरपालिका हद्यीत दुप्पट दर मिळतील.
2. जमिनीच्या निगडीत घटक (बांधकाम, घर विहीर, पाईपलाईन, फळझाडे, वनझाडे,शेततळे) यांचे निश्चित केलेल्या मुल्यांकन रकमेवर दुप्पट रक्कम अदा करण्यात येईल.
3. सदर प्रक्रिया वेळखाऊ आहे. त्यात भुधारकांना मोबदला देण्यासाठी 2-3 वर्ष कालावधी लागतो. तसेच वाढीव नुकसान भरपाई प्राप्त करण्यासाठी न्यायालयीन प्रक्रियेस किमान 10 वर्षांचा कालावधी लागतो.
4. सक्तीने भुसंपादन केल्यास बाजार भावाचा (रेडी रेकनर) दर निश्चित करण्यात येतो.
जिल्हास्तरीय समितीने निश्चित केलेले दर
(गावाचे नाव – प्रति हे. दर. 5 पट प्रमाणे येणारा दर)
पाटपिंप्री…. 11,12,293/- ……….55,61,465/-
बारागांवपिंप्री….. 12,52,813/- ………62,64,065/-
वडझिरे….. 11,52,017/- ………57,60,085/-
दातली….. 10,40,950/- ……….52,04,750/-
दोडी खुर्द…. 11,12,190/- ………55,60,950/-
देशवंडी….. 11,51,960/- ………57,59800/-
दोडी बु. …. 13,42,510/-…….. 67,12,550/-
गोंदे ….12,92,600/-……. 64,63,000/-
भूसंपादन कायद्यानुसार येणारा दर
(गावाचे नाव – प्रति हे. दर. 4 पट प्रमाणे येणारा दर)
पाटपिंप्री……….. 7,74,000/-……….. 30,96,000/-
बारागांवपिंप्री…….. 8,45,000/-………. 33,80,000/-
वडझिरे…… 7,74,000/- ………30,96,000/-
दातली ……6,91,000/- ………27,64,000/-
दोडी खुर्द …….6,91,000/- …….27,64,000/-
देशवंडी ……7,49,000/- ……..29,96,000/-
दोडी बु……….. 8,45,000/- ……33,80,000/-
गोंदे ……….8,45,000/- ……….33,80,000/-