नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहर परिसरातील लाचखोरी काही केल्या थांबत नसल्याचे दिसून येत आहे. आताही नाशिकरोड पोलिस स्टेशनचा लाचखोर पीएसआय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यात अडकला आहे. गणपत महादू काकड असे या लाचखोर पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. दाखल गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी त्याने १५ हजाराची लाच मागितली होती. आणि तो ही लाच घेताना रंगेहात सापडला आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीसह त्याच्या पत्नीवर नाशिकरोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी लाचखोर पीएसआय काकड याने २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर तडजोडी अंती ही रक्कम १५ हजार रुपये करण्यात आली. याप्रकरणी एसीबीकडे तक्रार करण्यात आली. त्याची दखल घेत एसीबीने सापळा रचला. आणि या सापळ्यात काकड हा रंगेहात सापडला. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
सापळा अधिकारी
गायत्री जाधव, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक मो.न. 7588516042
*सापळा पथक-
पो. हवा . बाविस्कर, पो. ना. प्रकाश महाजन, म.पो. ना. ज्योती शार्दूल.
मार्गदर्शक –
*मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक मो.न. 9371957391
मा .श्री माधव रेड्डी अपर पोलिस अधिक्षक, ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक. मो नं 9404333049
श्री. नरेंद्र पवार, वाचक, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक. मो.न. 9822627288.
याद्वारे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा.
दुरध्वनी क्रमांक- 02532578230,
टोल फ्री क्रमांक १०६४ .