नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ईईपीसी इंडियातर्फे 16 ते 18 मार्च 2023 दरम्यान चेन्नई येथे होणाऱ्या औद्योगिक प्रदर्शनात इंटरनॅशनल इंजिनीअरिंग सोर्सिंग शोमधून उद्योजकांना त्यांच्या उत्पादनाच्या ब्रँडिंगची नामी संधी उपलब्ध होणार आहे. आयमा या प्रदर्शनासाठी सहयोगी पार्टनर आहे ही नाशिककरांसाठी अभिमानाची बाब असून नाशिकच्या उद्योजकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन प्रदर्शनाची शोभा वाढवावी,असे आवाहन आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी केले.
आयमाने 2019मध्ये B2B च्या माध्यमातून नाशिकच्या उद्योजकांसाठी नवीन संधी उपलब्ध करून दिल्या व उद्योजकांना त्याचा मोठा लाभ झाला.याच धर्तीवर चेन्नई येथे होणाऱ्या ईईपीसी इंडिया तसेच आयमाच्या संयुक्त सहभागाने नाशिक बिझनेस मीट 2.0 (2023) हे जागतिक दर्जाचे हे प्रदर्शन आहे,असे पांचाळ पुढे म्हणाले. आयमा रिक्रीएशन सेंटर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पांचाळ बोलत होते.व्यासपीठावर त्यांच्यासमवेत आयमाचे उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, सुदर्शन डोंगरे,सह सचिव योगिता आहेर, गोविन्द झा, खजिनदार राजेंद्र कोठावदे आदी होते.
आयमाच्या सहकार्याने होणाऱ्या या प्रदर्शनातून उद्योजकांना कमीत कमी खर्चात स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नाशिकचे ब्रॅंडिंग राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर व्हावे हा प्रमुख उद्देश त्यामागचा आहे. ज्या उद्योजकांना प्रदर्शनात सहभागी व्हायचे असेल त्यांनी आयमाशी त्वरित संपर्क करावा असे आवाहन उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे आणि सुदर्शन डोंगरे यांनी केले. प्रदशनाविषयीची सर्व तपशीलवार माहिती आयमा कार्यालयात उपलब्ध आहे,असेही त्यांनी नमूद केले.
चेन्नई हे ऑटोकंपोनंट तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचे मोठे हब आहे. देशातील 35 टक्के ऑटो कंपोनंट तर 30 टक्के ऑटोमोबाईल इंडस्ट्री येथे आहेत.चेन्नई हे इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर कंपोनंट्सचे जगातील मोठे निर्यातदार केंद्र आहे. देशभरातील जास्तीत जास्त बँका आणि वित्तीय संस्थांचे मुख्यालय म्हणून चेन्नईकडे बघितले जाते बघितले जाते.चेन्नई येथील प्रदर्शनात आयमाचे खास पॅव्हेलियन असणार आहे.नाशकातून 25 उद्योजकांना नाशिकचे ब्रँडिंग करण्याचे करण्याचे तसेच तसेच नाशिकच्या उत्पादनांची जगभरात निर्यात वाढविण्याचे दालन यामुळे खुले होणार आहे. प्रदर्शनात 400 आंतरराष्ट्रीय आणि देशातील 1000 खरेदीदार कंपन्यांशी थेट संपर्क साधता येणार आहे, असे सहसचिव गोविंद झा म्हणाले. याआधी मुंबईत मेकईन नाशिक प्रदर्शन भरविण्यात आले होते.आता आयमाने चेन्नईत प्रदर्शन भरविण्याचे धाडस केले असून यामुळे नाशिकच्या उत्पादनांच्या निश्चितच प्रोत्साहन मिळेल,असा विश्वास कोषाध्यक्ष राजेंद्र कोठावदे यांनी व्यक्त केला.
Nashik Products Branding in Chennai International Expo